अग्निशमन दल कार्यालय अन्यत्र हलवून जागा हडपण्याचा डाव 

The move to grab space by moving the fire brigade office
The move to grab space by moving the fire brigade office

सांगली : शहराच्या मध्यवर्ती भागात रेवणी रस्त्यावरील अग्निशमन दलाचे कार्यालय स्थलांतर करण्यास भाजपच्या नगरसेविकांनी विरोध केला आहे. हे कार्यालय अन्यत्र हलवून जागा हडपण्याचा डाव असल्याचा आरोप नगरसेविका स्वाती शिंदे यांनी केला. याबाबत महिला नगरसेविकांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदनही दिले. 

भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा, नगरसेविका स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारती दिगडे, गीतांजली ढोपे पाटील, नसीमा नाईक, उर्मिला बेलवलकर, सुनंदा राऊत या नगरसेविकांनी आज अग्निशमन दलाच्या कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. 

ऍड. शिंदे म्हणाल्या,""प्रभाग क्रमांक सोळामधील रेवणी रस्त्यावर महापालिकेचे अग्निशमन कार्यालय आहे. हे कार्यालय स्टेशन चौकातील जागेत स्थलांतर केले आहे. याबाबत नगरसेवकांना कोणतीही माहिती प्रशासनाने दिली नाही. कापडपेठ, गणपती पेठ, बुरुड गल्ली, मारुती रस्ता, गावभाग, खणभाग, वखारभाग हा परिसर दाट वस्तीचा, तसेच व्यापार-उद्योगाचा आहे. त्यामुळे भविष्यात आपत्ती घडल्यास अग्निशमनच्या गाड्या पोहोचण्यासाठी वेळ लागणार आहे. तसेच कृष्णा नदीलगतच्या भागामध्ये दरवर्षीच्या पावसाळ्यामध्ये कमी-अधिक प्रमाणात पूर येत असतो. 

पूरग्रस्त भागात अग्निशमन विभागाचेच कर्मचारी मदतकार्य करीत असतात. त्यामुळे कृष्णा नदीलगतच्या भागापासून देखील रेवणी रस्ता जवळ आहे. याचा विचार करून रेवणी रस्त्यावरील फायर स्टेशनच्या जागेतच नवे फायर स्टेशन बांधण्यात यावे.'' 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com