शिरनांदगी तलावात पाणी सोडण्यासाठी मंगळवेढ्यात आंदोलन

mangalwedha
mangalwedha

मंगळवेढा - तालुक्याच्या दक्षिण भागात प्रशासनाकडून म्हैसाळचे पाणी शिरनांदगी तलावात सोडण्यासाठी अनेक वेळा दिलेल्या तारखा पाळल्या नाहीत. उलट प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींची आणि या भागातील शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचे दिसून येऊ लागल्याने अखेर जि.प.सदस्या शैला गोडसे यांनी शिरनांदगी तलावांमध्ये पाणी येईपर्यंत हे आंदोलन सुरू केले आहे. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना शिवसेनेच्या जिल्हा परिषदेचे आंदोलन म्हणजे सत्ताधारी पक्षाला घरचा आहेर ठरल्यासारखे झाले. 

शिवसेना-भाजप युतीच्या सरकारने मंजुरी दिलेल्या या योजनेच्या कामाला मध्यंतरी सत्ताबदलामुळे निधीअभावी खंड पडला. आता विद्यमान सरकारने मुली दिलेले अंतिम टप्प्यात येत आहे. परंतु, सध्याच्या भीषण दुष्काळी परिस्थितीत या भागात म्हैसाळचे पाणी येणारच नाही अशी मानसिकता या भागातील शेतकऱ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये होऊ लागली एका बाजूला हे पाणी येणारच आहे. असं सांगितल्यावर सुद्धा या भागातील शेतकरी आता विश्वास ठेवायला तयार नाही म्हणून जोपर्यंत शिरनांदगी तलावात म्हैसाळ योजनेचे मंगळवेढ्याच्या हक्काचे पाणी येत नाही. तोपर्यंत शिरनांदगी तलावामध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे निवेदन म्हैसाळ योजनेचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना आठ दिवसापूर्वी देण्यात आले होते. तसेच जिल्हाधिकारी सोलापूर व सांगली व इतर पोलिस अधिकाऱ्यांना या आंदोलनाबाबत कळवण्यात आले.

हे आंदोलन कोणत्याही नेत्याच्या अथवा कार्यकर्त्यांच्या विरोधात नसून शेतकऱ्यांच्या हक्काचे म्हैसाळचे पाणी शिरनांदगी तलावात तात्काळ सोडण्यासाठी प्रशासनाला भाग पाडण्यासाठी हे आंदोलन आज दि 26 स. संत दामाजी, संत चोखोबा तसेच शिरनांदगीचे ग्रामदैवतचे दर्शन घेऊन सुरू केले.
- शैला गोडसे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com