राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘धक्का मार’ आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘धक्का मार’ आंदोलन

सांगली - केंद्राने केलेल्या इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सांगलीत ‘धक्का मार’ आंदोलन करण्यात आले. स्टेशन चौकापासून सुरू झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दुचाकी वाहने ढकलत राजवाडा चौकापर्यंत नेली. सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन संपल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलनात पक्षाच्या नगरसेवकांची उपस्थिती होती. इंधन दरवाढ अशीच सुरू राहिली तर भविष्यात प्रवास कसा होईल याचेही दर्शन आज आंदोलनांद्वारे दाखवून दिले. डॉक्‍टर, वकील, विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी बैलगाडीतून प्रवास करीत आले.

राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले,‘‘सत्ताधारी सरकारने इंधन दरवाढीने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर जनमत सरकारविरोधात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवून सत्ता हस्तगत केली. मात्र जनतेला अच्छे दिन अजूनही अनुभवता आले नाहीत. जनतेचा रोष पाहता दरवाढ करणाऱ्या सरकारला मुदतवाढ मिळणार नाही. पुन्हा आपलं सरकार, जनतेचं सरकार म्हणजेच आघाडीचं सरकार येणार आहे.’’

विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, नगरसेवक दिग्विजय सुर्यवंशी, पद्माकर जगदाळे, विराज कोकणे, मैनुद्दीन बागवान, राहुल पवार, आयुब बारगीर, योगेद्र थोरात, अभिजीत हारगे, सचिन जगदाळे आदी सहभागी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com