विजयादशमी निमित्त कोल्हापुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर - दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शहरात संचलन मोठ्या उत्साहात झाले. यामध्ये महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. 

कोल्हापूर - दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शहरात संचलन मोठ्या उत्साहात झाले. यामध्ये महसूल मंत्री चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. 

रंकाळ्याच्या काठावर, ऐतिहासीक संध्यामठाच्या लगत असलेल्या खराडे कॉलेज मैदानातून या संचलनाची सुरुवात झाली. याच संध्यामठाच्याजवळ , माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांनी रंकाळा तलावाचे सौंदर्य पाहिले. त्याच ठिकाणाहून संचलनाची सुरुवात म्हणजे एका निष्ठावान संघ स्वयंसेवकाला मानवंदनाच ठरली. 

महापौर शोभाताई बोन्द्रे, माजी महापौर सई खराडे यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पूजन करून झाले. पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन भगवा ध्वज मार्गस्थ झाला. शिवाजी पेठेतील अर्धा शिवाजी पुतळा येथे कोल्हापूर शहर संघचालक मा. डॉ. सूर्यकिरण वाघ यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, रविवार पेठ, शनिवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ हा कोल्हापूरचा मूळ भाग संचलनामुळे संघमय वातावरणात न्हाऊन निघाला.

संचलनात कोल्हापूर विभाग संघचालक आप्पा दड्डीकर, कोल्हापूर विभाग कार्यकारिणी सदस्य भाई येसणे, मुकुंद भावे, पश्चिम महाराष्ट्र धर्माचार्य सम्पर्क प्रमुख प्रफुल्ल जोशी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोल्हापूर उत्तर जिल्हा कार्यवाह केदार जोशी, कोल्हापूर शहर कार्यवाह विवेक मंद्रुपकर उपस्थित होते. 

संचलन कार्यक्रमात चहासाठी कागदी किंवा प्लास्टिक कप वापरू नयेत म्हणून चहापान कार्यक्रमाला पूर्ण फाटा देण्यात आला. त्या ऐवजी केळ आणि राजगिरा लाडू यांचे वाटप केले. 
 

Web Title: Movement of Rashtriya Swayamsevak Sangh in Kolhapur on the occasion of Vijaya Dashmi