समरजितसिंह घाटगेंना युतीची उमेदवारी जाहीर करा - चंद्रकांत पाटील

समरजितसिंह घाटगेंना युतीची उमेदवारी जाहीर करा - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर - "शाहू-कागल'चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी गेल्या चार वर्षात केलेले काम पाहता त्यांची शिवसेना-भाजप युतीची उमेदवारी आताच जाहीर करा, त्यांना राज्यात विक्रमी मताधिक्‍यांनी विजयी करू, अशी ग्वाही आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात दिली. 

कागलच्या शाहू कारखान्याचे संस्थापक कै. विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण कागल येथे आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात श्री. पाटील बोलत होते. या शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने समरजितसिंह घाटगे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. 

" तीन महिन्यात विधानसभेच्या निवडणुकात आहेत. भाजप-शिवसेना ही निवडणूक एकत्र लढणार आहे, कागलची जागा भाजप लढणार आहे. मुख्यमंत्री या विषयाचा योग्य निर्णय करतील. युतीचा उमेदवार म्हणून समरजितसिंह घाटगेंना घोषित करा, या महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी त्यांना विजयी करू. याबाबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची परवानगी मुख्यमंत्र्यांनी फक्त घ्यावी.' 

- चंद्रकांत पाटील

श्री. पाटील म्हणाले, "कारखाना परिसरात कै. घाटगे यांचा पुतळा उभा रहावा, ही सगळ्यांची इच्छा होती. मी सुद्धा आमदार नसतानाही विक्रमसिंह राजेंचा भक्त होता. दररोज संध्याकाळी त्यांची अंबाबाई मंदीरात भेट व्हायची. कागलसाठी विक्रमसिंह यांनी पाणी, शिक्षण, रोजगार निर्मितीच्या सुविधा दिल्या. शेतीला चांगले दिवस त्यांनी आणले. 

कागलचा सांभाळ कर, अशी इच्छा विक्रमसिंह घाटगे यांनी समरजितसिंह यांच्याकडे व्यक्त केली. त्यांचा शब्द खरा करण्याचे काम समरजितसिंह करत आहेत. फार मोठ्या आणि विशेषतः राजघराण्यातील व्यक्तींनी असे वणवण भटकण्याची गरज नाही. पण तरीही माझ्या कागलची काळजी घे, हे वडीलांचे स्वप्न करण्यासाठी ते धडपडत आहेत.

- चंद्रकांत पाटील

श्री. पाटील म्हणाले, लोकशाही ही समाजाचे विकास करण्याचे माध्यम आहे. समरजितसिंह यांनी कारखाना, दूध संघ, शाळा व्यवस्थित चालवल्या आहेत. अधिकाधिक शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळेल यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पत्नींचेही कौतुक करावे तेवढे कमी आहे. राममंदीर पूर्ण केल्यानंतर जो काही आनंद विक्रमसिंह घाटगे यांना झाला असेल त्यापेक्षी जास्त आनंद या पती, पत्नींचे काम पाहून झाला असेल.' 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com