mp ranjeetsingh nimbalkar sangola development work funding of 9 cr bjp chetansingh kedar sawant
mp ranjeetsingh nimbalkar sangola development work funding of 9 cr bjp chetansingh kedar sawant sakal

Sangola News : MP रणजितसिंह निंबाळकरांच्या पाठपुराव्याला यश; विकास कामांसाठी ९ कोटींचा निधी मंजूर; चेतनसिंह केदार-सावंत

विकासकामांना गती देण्यासाठी निधी मंजूर केल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली

सांगोला : ग्रामीण भागात गावांतर्गत मूलभूत सुविधा देण्यासाठी लेखाशिर्ष २५१५ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, माढा आणि करमाळा तालुक्यातील १०० विकास कामांसाठी तब्बल ८ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून विकासकामांना गती देण्यासाठी निधी मंजूर केल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.

करमाळा तालुक्यातील आवटी येथे येथील येथील येडेश्वरी मंदिरासमोर सभामंडप १० लाख, कंदर पवार घर ते थोरे घर रस्ता १० लाख, केम हनुमान मंदिरासमोर सभामंडप १० लाख, केम भैरवनाथ मंदिरासमोरील सभामंडप १० लाख,

चिकलठाण सुराणा घर ते उंबरे घर रस्ता १० लाख, चिकलठाण टिंगरे घर ते जि.प.शाळा चिकलठाण रस्ता १० लाख, जिंती-पोमलवाडी रस्ता १० लाख, जिंती ते रेल्वे स्टेशन रस्ता १० लाख, तरटगाव सभागृह १० लाख, पोमलवाडी वाचनालयासाठी सभागृह १० लाख,

भालेवाडी ते गावठाण रस्ता १० लाख, वांगी नं. ३ येथे सातव ते पांडेकर घर रस्ता १० लाख, वांगी नंबर ४ तांबोळी दुकान ते ढवळे घर रस्ता १० लाख, रांझणी येथे ओंकारनाथ देवस्थान पेव्हर ब्लॉक १० लाख, करंजे व्यायामशाळा ५ लाख,

झरे अमृळेवस्ती ते बागल वस्ती रस्ता ५ लाख, झरे चौधरीवस्ती ते चौघ घर रस्ता १० लाख, बिटरगाव श्री ते जुना करमाळा रस्ता १० लाख, मोरवड येथे व्यायामशाळा १० लाख, मिरगव्हाण स्मशानभूमी सुशोभीकरण ५ लाख, मिरगव्हाण गावठाण ते शिरसठ महाराज मंदिर रस्ता ५ लाख.

पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे वडार समाजासाठी सभागृह १० लाख, गार्डी येथे दत्त सायकल दुकान ते गुरव घर पालखी मार्ग १० लाख, नारायण चिंचोलीत अंतर्गत रस्ता १० लाख, भाळवणी इगतपुरी वस्तू ते जोडपुर भवानी रस्ता १० लाख, भाळवणी राजू इंगळे वस्ती रस्ता १० लाख, खेडभोसेतील वाड्यावस्त्यांवरील रस्ते १० लाख.

माढा तालुक्यातील उजनी येथील सरवदे वस्ती ते शिराळ उजनी, पिंपळनेर शिवरस्ता २० लाख, उपळवटे-केम रस्ता ते खूपसे वस्ती रस्ता १० लाख, उपळाई विठ्ठलवाडी रस्ता ते राऊत वस्ती रस्ता १० लाख, टाकळी भोसलेवस्ती ते कांबळेवस्ती रस्ता १० लाख,

तांबवे करंडे वस्ती ते भोसले वस्ती रस्ता १० लाख, परिते ते नॅशनल हायवे 65 रस्ता १० लाख, बेंबळे आदिवासी पारधी समाजमंदिर १० लाख, बैरागवाडी रावसाहेब सुर्वे घर ते रेल्वेलाईन रस्ता १० लाख,

मोडनिंब पाटील हॉस्पिटल ते चव्हाण घर रस्ता १० लाख, सापटणेमध्ये अंतर्गत रस्ता १० लाख, टेंभुर्णी देशमुख वस्ती ते आटकळे वस्ती रस्ता १० लाख, रोपळे कव्हे गाववेस ते सद्गुरु भक्तीमंदिर रस्ता १० लाख, अकोले खुर्द ते महाडिक वस्ती रस्ता १० लाख.

माळशिरस तालुक्यातील मोटेवाडी येथे मोटेवस्ती ते खरातवस्ती रस्ता १० लाख, उंबरे मेडद रस्ता १० लाख, कन्हेरी एकमोरी ते जाधव वस्ती रस्ता १० लाख, कोळेगाव ज्ञानेश्वर मंदिरासमोर सभामंडप १० लाख, चौंडेश्वरवाडी बंदिस्त गटार १० लाख,

दहिगाव ते सावंत वस्ती रस्ता १० लाख, दहिगाव ते चाहूर वस्ती रस्ता १० लाख, धर्मपुरी शिंदेवाडी वस्ती ते काटकर घर रस्ता १० लाख, पिंपरी खडकमाळ ते उंबरदेव रस्ता १० लाख, बचेरी खरात वस्ती ते माने वस्ती रस्ता १० लाख,

भांब इजबाव ते सरगर शेतरस्ता १० लाख, मळोली मनोज जाधव ते मेट रस्ता १० लाख, महाळूंग श्रीपुर सांस्कृतिक भवन १० लाख, महाळूंग श्रीपुर समाजमंदिर १० लाख, मांडवे करल वस्ती रस्ता १० लाख, संगम अंगणवाडी ते नरसिंहपूर रस्ता १० लाख,

फळवणी पीर मंदिरासमोर सुशोभीकरण १० लाख, पानीव महालक्ष्मी मंदिर ते शिंदे रस्ता २० लाख, माळीनगर रमामत कॉलनी येथे महिलांसाठी सार्वजनिक शौचालय १० लाख, माळीनगर डोंबारी वसाहत महिलांसाठी सार्वजनिक शौचालय १० लाख,

बोरगाव श्रीनाथ नगर अंतर्गत रस्ता १० लाख, बोरगाव इदगाह मैदान दुरुस्ती व संरक्षण भिंत ५ लाख, माळेवाडी (बोरगाव) अंतर्गत रस्ता १० लाख, जांबुड अंतर्गत रस्ता १० लाख, निमगाव- वेळापूर रस्ता ते तोरणे-मगर रस्ता ५ लाख,

तरंगफळ-पिलीव रस्ता ते अक्षय कोडलकर वस्ती रस्ता ५ लाख, काळमवाडी श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर ते शिंगोर्णी रस्ता ५ लाख, चांदापुरी कुसमोड रस्ता ते कोपनर वस्ती रस्ता ५ लाख, निमगाव-मळोली रस्ता ते यादव-मगर वस्ती रस्ता ५ लाख,

सांगोला तालुक्यातील वासूद हेमंत शिंदे घर ते सौदागर नकाते घर रस्ता ५ लाख, एखतपुर अंबिका मंदिर पेव्हिंग ब्लॉक १० लाख, कटफळ सभामंडप १० लाख, कडलास शिवाजीनगरमध्ये सभामंडप १० लाख, कोळा म्हसोबा मंदिरासमोर सभामंडप १० लाख, खिलारवाडी जि.प. शाळेसमोर पेव्हींग ब्लॉक ५ लाख,

घेरडी येथे मारुती मंदिरासमोर सभामंडप १० लाख, चिंचोली-धायटी रोड ते बंडगर वस्ती रस्ता ५ लाख, चिनके अगतराव मिसाळ घर ते प्रकाश काटे घर रस्ता ५ लाख, जवळा गणपती मंदिरासमोर सभामंडप १० लाख, जवळा कोळी शाळा ते साळेवस्ती रस्ता १० लाख,

तिप्पेहाळी सांगोलकर वस्ती ते काटवान वस्ती रस्ता १० लाख, धायटी शहाजी भोसले वस्ती ते संजय भोसले रस्ता ५ लाख, नाझरे-आटपाडी रोड ते रायचुरे वस्ती रस्ता ५ लाख, पारे स्मशानभूमीत पेव्हिग ब्लॉक ५ लाख, बलवडी सभामंडप १० लाख,

बामणी अंतर्गत रस्ते डांबरीकरण १० लाख, भोपसेवाडी बिरोबा मायाक्का मंदिर परिसर काँक्रिटीकरण व पेव्हींग ब्लॉक १० लाख, मंगेवाडी रामोशी वस्तीवर व्यायामशाळा १० लाख, महूद गोडसे वस्ती ते येडगे वस्ती रस्ता १० लाख,

महूद गावठाण बंधारा ते माळी परीटवस्ती रस्ता ५ लाख, मांजरी चंदनशिवे घर ते विद्याधन निवास पर्यंत रस्ता ५ लाख, मानेगाव बाबर घर ते राजुरी रस्ता ५ पाच लाख, मेथवडे ते जुना शिरभावी रस्ता १० लाख, वाकी सभामंडप १० लाख,

वाटंबरे गणपती मंदिरासमोर सभामंडप ५ लाख, वाढेगाव मरीआईमाता मंदिरासमोर पेव्हींग ब्लॉक ५ लाख, वासूद स्मशानभूमी सुधारणा १० लाख, शिवणे ग्रामपंचायत कार्यालयासमोर पेविंग ब्लॉक ५ लाख, सोनंद-डोंगरगाव-हणमंतगाव रस्ता १० लाख रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com