पश्चिम महाराष्ट्र व सलग्न कोकणकरीता हवे स्वतंत्र कृषी विद्यापीठ

पश्चिम महाराष्ट्र व सलग्न कोकणकरीता हवे स्वतंत्र कृषी विद्यापीठ

नवी दिल्ली - पश्चिम महाराष्ट्र व सलग्न कोकणकरीता नवे कृषी विद्यापीठ मंजूर करावे, अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. तसेच कोल्हापूरशी निगडीत विविध महत्वाच्या मागण्यांकरीता खासदार मंडलिक यांनी मोदी यांची भेटही घेतली. यावेळी त्यांचासमवेत शिवसेना संसदीय गटनेते खासदार विनायक राऊत हे होते.  

कोल्हापूर जिल्हा हा शेती प्रधान आहे. कोल्हापूरसह लगतच्या कोकणपट्यातही भात शेती मोठ्या प्रमाणात पिकवली जाते. पश्चिम महाराष्ट्रात ऊस शेतीसह साखर कारखान्यांची संख्याही लक्षणीय आहे.  हा भाग डोंगरी असून याठिकाणी शेती पदवीधारक विद्यार्थ्यांची संख्या दिवसागणित वाढतच आहे. या ठिकाणी नविन कृषी विद्यापीठ मंजूर झाल्यास विद्यापीठाअंतर्गत पिकांच्या नवीन दर्जेदार प्रजाती व वाणांचा अभ्यास करता येईल. पश्चिम महाराष्ट्र व सलग्न कोकणकरीता एक नवे कृषी विद्यापीठ मंजूर व्हावे, अशा मागणीचे पत्र खासदार मंडलिक यांचेसह खासदार राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com