अनिल बाबरांनी राजकारणाचा धंदा केला

खासदार पाटील यांची टीकाः आम्हाला ललकारू नका; दिघंचीत नागरी सत्कार
Sanjay patil
Sanjay patilSakal

दिघंची - आमदार अनिल बाबर यांनी राजकारणाचा धंदा केला आहे. ज्यांनी आमदार होण्यासाठी तुम्हाला मदत केली त्यांच्यावर घाला घालता? आम्हाला ललकारू नका, नाही तर तुमच्या भानगडी बाहेर काढू, असा इशारा खासदार संजय पाटील यांनी आमदार अनिल बाबर यांना दिघंची येथील सभेत दिला.

दिघंची येथे केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत वॉर्ड क्र. एक, दोन व सहा मध्ये वाडी-वस्तीसाठी मंजूर झालेल्या पाणी योजने, प’ारंभ झाला. त्यावेळी ते भाजप कार्यकर्त्यांचा मेळाव्यात बोलत होते. माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, भाजपचे जयवंत सरगर, माणगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष भगवान मोरे, बळी मोरे, मोहन रणदिवे यांची उपस्थिती होती.

खासदार पाटील म्हणाले, ‘‘केंद्र शासनाची ३ कोटी २९ लाखांची जलजीवन योजना मी व अमरसिंह देशमुख यांनी मंजूर करून आणली, म्हणून तरी उद्‌घाटनाला बोलवायचे आणि ‘मी केले, मी आणले,’ म्हणायचे. राज्य काय आपल्या बापाचे आहे का, असा सवाल उपस्थित केला. तुम्ही काही राजकारणात ताम’पट घेऊन जन्माला आलाय का? मंत्री एकनाथ शिंदेंना सांगता, मुख्यमंत्री तुम्हीच व्हायला पाहिजे. मी बोलतो तर अवघड होईल.’’

अमरसिंह देशमुख म्हणाले, येणाऱ्या विधानसभेचा आमदार हा वेगळा असणार आहे. विद्यमान आमदार अनिलभाऊ यांच्यावर आमचा रोष आहे. दिघांची वाडी-वस्तीची तीन कोटींची योजना आम्ही मंजूर करून आणली. तुम्ही भूमिपूजन केले. तुम्ही चार वेळा आमदारकी लढविली. आम्ही तीन वेळा मदत केली.’’ ‘‘गत विधानसभेला खासदार संजय पाटील यांच्या सांगण्यावरून व संघर्ष कमी करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने मदत केली. तुम्हाला निवडून आणले. तालुक्यातील सर्व विरोधक एक झाले असताना तुम्ही हातात हात घालून विकासाचे प्रश सोडवायला पाहिजे होते. मात्र तसे झाले नाही; उलट तुम्ही पुढे! पण आमची जिरवायची म्हणून करताय असं का, याचे उत्तर द्यावे. माणगंगा कारखान्याचा काही निर्णय चुकल्याची कबुली देशमुख यांनी दिली. लवकरच त्या अडचणी दूर करून साखर कारखान्याचे धुराडे आम्ही पेटवू,’’ असे सांगितले. या सत्कार समारंभास प्रणव गुरव, शहाजी यादव, केशव मिसाळ, सावंता पुसावळे आदींची उपस्थिती होती.

‘धनगाव योजनेचे जनक करू’

‘‘११० कोटी रुपये खर्च झालेली आटपाडी तालुक्याची पिण्याच्या पाण्याची धनगाव योजना आमदार अनिल बाबर यांनी बंद पाडली. उर्वरित लागणारा निधी आणून त्यांनी ती पूर्ण करावी, आम्ही त्यांना धनगाव योजनेचे जनक करू,’’ असा टोला ग्वाही अमरसिंह देशमुख यांनी लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com