खासदार संजयकाका पाटील म्हणाले, ""मी हिशेब ठेवतो '' 

अजित झळके
रविवार, 8 सप्टेंबर 2019

सांगली - लोकसभा निवडणुकीत विरोधकांसह स्वकियांच्या नाराजीतून सावरत दीड लाख मताधिक्‍याने खासदार झालेल्या संजयकाका पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत त्याची परतफेड करण्याचा शब्द आज भाजपच्या बूथ कमिटी मेळाव्यात दिला. "काळजी करू नका, संजयकाका हिशेब ठेवतो', अशा शब्दांत त्यांनी विधानसभेला मैदानात उतरणाऱ्यांना आश्‍वस्त केले. 

सांगली विधानसभा मतदार संघाच्या बुथ कमिटीचा हा मेळावा होता. त्याला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हजर होते. त्यावेळी प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी संजयकाकांना "काका तुम्ही आता निसटलाय, इतरांचेही बघावे लागेल', अशा शब्दांत कोपरखळी हाणण्याचा प्रयत्न केला. खासदार पाटील यांचा आठपैकी सहा मतदार संघात प्रभाव असून त्यांना मानणारा गट आहे. त्यामुळे त्यांनी विधानसभेला ताकदीने मदत करावी, अशी अपेक्षा केळकर यांनी व्यक्त केली. 

त्यावर संजयकाका म्हणाले, ""लोकसभा निवडणुकीत जातीचे राजकारण झाले. वंशवादाचे विष पेरले गेले. नको त्या पातळीवर जावून प्रचार केला गेला, मात्र कार्यकर्त्यांच्या बळावर आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्याने मी जिंकलो. मी पार पडलो, असे नीताताई म्हणाल्या. त्यांनी काळजी करू नये. मी हिशेब ठेवणारा माणूस आहे. माझ्या अडचणीच्या काळात ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्याची परतफेड मी नक्की करेन.'' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP SanjayKaka Patil comment in BJP conference