विसर्जन तळ्यांचा निर्णय तातडीने व्हावा : खासदार उदयनराजे भोसले

सिद्धार्थ लाटकर
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

सातारा : सार्वजनिक गणेश मंडळांच्या, तसेच घरगुती गणपतींचे विसर्जनासाठी मोती तळे, तसेच मंगळवार तळे या दोन तळ्यांची परवानगी द्यावी, या मागणीसाठी आज (सोमवार) खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांची भेट घेतली. त्यानंतर खासदार भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

सातारा : सार्वजनिक गणेश मंडळांच्या, तसेच घरगुती गणपतींचे विसर्जनासाठी मोती तळे, तसेच मंगळवार तळे या दोन तळ्यांची परवानगी द्यावी, या मागणीसाठी आज (सोमवार) खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांची भेट घेतली. त्यानंतर खासदार भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

ते म्हणाले, "गणपती विसर्जनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सातारा शहरातील गणेश विसर्जन तळ्यासंदर्भात कोणतीही न्यायप्रविष्ठ बाब नाही. विसर्जनानंतर या तळ्यांच्या परिसरात रोगराई होऊ नये, यासाठी उपाययोजना करा. त्या परिसरातील नागरिकांची काळजी घ्या, अशी सूचना पालिकेस केली आहे. मोती तळे आणि मंगळवार तळ्यांच्या साफसफाईसंदर्भात सूचना केली आहे. त्याबाबत अॅफिडेव्हिट करण्यास मुख्याधिकारी यांना सांगितले आहे. पिढ्यानपिढ्या तोच मार्ग आहे.''

रिसालदार तळ्यासंदर्भात खासदार भोसले म्हणाले, "एसपी पाटील बदलल्यानंतर आता देशमुख आले आहेत. शेवटी पोस्ट इज पोस्ट. वास्तविक एखाद्या अधिकाऱ्याने निर्णय घेतला असेल, तर तो थोडीच तुम्ही खारीज करू शकता. आता तर उत्सवाला 15 दिवसच राहिले. आता कोण ऐकणार आहे. कलेक्‍टरचे नाही, पोलिसांचे नाही, माझं नाही, कोणाचं नाही. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणारच. कारण प्रत्येकाची भावना त्याच्याशी निगडित आहेत. जिल्हाधिकारी यांना मी सांगितले आपण तळ्यांबाबत विचार करा. तुम्ही केला... नाही केला... तरी लोक तुमचं नाही ऐकणार, माझंही नाही ऐकणार, एसपींचे तर अजिबातच ऐकणार नाहीत. लोकभावनेपुढे काय करू शकता... रॅपिड ऍक्‍शन फोर्स मागविणार, एसआरपी मागविणार का आणखी काय.... कोण कंट्रोल करणार. पोलिसांची पोरं; पण पोलिस डिपार्टमेंटला ऐकणार नाहीत. ही वस्तुस्थिती आहे.''

दरम्यान नगरविकास आघाडीने मध्यंतरी जिल्हाधिकारी यांच्याकडे पालिकेच्या कारभाराविषयी तक्रारी करून विशेष सभा बोलावली होती. त्यावर खासदार भोसले म्हणाले, "कलेक्‍टर म्हणजे नेमके कोण. मानल तर देव नाहीतर दगड. कोण कलेक्‍टर. पालिका ही स्वायत्ता संस्था आहे. त्यांची स्वायत्ता काढली तर मग काय. त्यांच्या काही तक्रारी असतात. त्या सोडविण्यासाठी सीईओ आहेत. नगरसेवक आहेत. अन्यथा कलेक्‍टर यांनी सांगावे तुम्ही सगळ्यांनी राजीनामा द्या. मी बघते ना. बनते नगराध्यक्ष. सांभाळते पालिका. माझा मंगळवार तळ्याला विरोध नाही. त्याच्या सौंदर्याला बाधा येते. त्याची देखरेख झाली पाहिजे एवढेच म्हणणे आहे.'' 

Web Title: MP Udayanraje Bhosale meet collector about ganesh festival