एमपीएससी पीएसआय परीक्षेत सुमित खोतचे यश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 मार्च 2019

कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत सुमित कल्लाप्पा खोत (रा. देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) यांनी सर्वसाधारण प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.

कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत सुमित कल्लाप्पा खोत (रा. देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) याने सर्वसाधारण प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.

भटक्‍या विमुक्त जमाती ‘क’ प्रवर्गातून कसबा बावडा येथील आरती सुरेश पिंगळे हिने राज्यात द्वितीय, रेश्‍मा नामदेव पाटील (कोरिवडे, पेरणोली, ता. आजरा) हिने पाचवा, श्रीकांत मोहन वासुदेव (भेंडवडे, ता. हातकणंगले) याने एनटीबी प्रवर्गातून पाचवा, संदीप नामदेव गुरव (पाल, ता. भुदरगड) याने ओबीसीतून सहावा, सौरभ मुसळे याने एसबीसीतून सहावा, तर शरद सोनबा माने (पिंपळगाव, ता. कागल) याने राज्यात आठवा क्रमांक पटकावून कोल्हापूरचा झेंडा फडकवला. 

विनायक शिवाजी फराकटे याने (कासारवाडा, ता. राधानगरी) 
ओबीसीतून तेरावा, नीता जोतिराम शेलार (आसुर्ले, ता. पन्हाळा) ओबीसी सोळावा, तर सोमनाथ हरी जाधव (प्रियदर्शन कॉलनी, उचगाव) राज्यात विसावा क्रमांक मिळवला, तर अमोल हरिदास माने (रा. मंगळवेढा, जि. सोलापूर), योगेश आनंदा खैरावकर (कवठेमहांकाळ, जि. सांगली), विष्णू रामदास वाघमोडे, पंकज होळे, बाळासाहेब वाकडे, भाग्यश्री कांबळे, अमोल जगन्नाथ पाटील, प्रतिमा पंढरीनाथ पोवार हेही यशस्वी झाले.

कोल्हापूर जिल्ह्यातील तीसहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळविले. परीक्षेचा निकाल दुपारी जाहीर होताच यशस्वी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात गुलालाची उधळण करत जल्लोष केला. या पदासाठी पूर्व परीक्षा १६ जुलै २०१७, मुख्य परीक्षा ५ नोव्हेंबर २०१७, तर मुलाखत प्रक्रिया ऑक्‍टोबर-नोव्हेंबर २०१८ला झाली होती. परीक्षेचा निकाल लवकर जाहीर होत नसल्याबद्दल विद्यार्थ्यांत नाराजी होती. आज निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत राहिला. यशस्वी विद्यार्थ्यांपैकी अनेकांना एबी फाऊंडेशन, अरुण नरके फाऊंडेशन व युनिक ॲकॅडमीचे मार्गदर्शन मिळाले.  

परीक्षेतील यशस्वी असे : 
अमित रमेश नांगरे (वडणगे, ता. करवीर) एससी राज्यात २२, विशाल मोरे (हणमंतवाडी, ता. काटेगाव, जि. सांगली) राज्यात २२, सविता जगन्नाथ धोत्रे (शिरोली पुलाची) ओबीसी २२, प्रवीण रामराव यादव (कोतोली, ता. पन्हाळा) राज्यात २७, ऐश्‍वर्या अरविंद ऐताळ (नाथागोळे तालीम, शिवाजी पेठ) राज्यात ३०, शशिकांत दत्तात्रय पाटील (शित्तूर तर्फ मलकापूर, ता. शाहूवाडी) ओबीसी ३०, अक्षय दिलीप सरवदे (वाळवेकरनगर, ता. हातकणंगले) एससी ३१, वैभव निवास गाडे (अष्टविनायक कॉलनी, टेंबलाईवाडी) एससी ३४, इंद्रजित मारुती चव्हाण (प्रकाश हाऊसिंग सोसायटी, जयसिंगपूर) राज्यात ३४, श्रृंखला श्रीकांत पाटील - (नाधवडे, ता. कागल) राज्यात ३९, उमेश तुकाराम नेर्लेकर (चरण, ता. शिराळा) राज्यात ४४, प्रमोद प्रकाश खाडे (सावर्डे, ता. हातकणंगले) राज्यात ४८, स्वप्नाली पांडुरंग भोसले (धुलगाव, ता. कवठेमहांकाळ) राज्यात ४९, राहुल सूर्याजी पाटील (सावर्डे, ता. हातकणंगले) ५९, मनीषा मधुकर कागलकर (भोसले पार्क, कदमवाडी, कोल्हापूर) ६२, अभिजित आनंद माने (येळवी, ता. तासगाव) ७१, सायली तानाजी वारके (मजरे कासारवाडा, ता. राधानगरी) ७३, विजय सुरेश सरदेसाई (चितळे, वाटंगी, ता. आजरा) राज्यात ८०, राजश्री सुनील पातले (पनोरी, ता. राधानगरी) ८९, अजय जिन्नाप्पा पोवार (आदर्शनगर रिंगरोड, कुरुंदवाड) राज्यात ९८, शीतल महादेव पाटील (वायफले, ता. तासगाव, जि. सांगली) १०२, प्रितम चौगुले (अब्दुललाट, ता. शिरोळ) राज्यात १०८ , दीपक शंकर पोवार (शेंडूर, ता. कागल) १११, सुरेश शिवाजी देसावळे (कोरेगाव, ता. वाळवा) राज्यात ११७, विकास सुभाष मोरे (कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) १३८, दीपक आनंद माने (कुशिरे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) १७५, प्रफुल्ल चंद्रकांत चव्हाण (इचलकरंजी) १९५, दयानंद पाटील (कडाल, ता. गडहिंग्लज) २०२, वैभव माणिक मगदूम (रा. गारगोटी).

विद्यापीठात जल्लोष
शिवाजी विद्यापीठातील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयाच्या नव्या अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या अठरा जणांनी यश मिळविले. दुपारी निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. विद्यापीठ परिसरातून त्यांनी दुचाकी फेरी काढत जल्लोष केला. त्यांच्या सहकारी मित्रांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव तर केलाच; शिवाय आतषबाजीही केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MPSC PSI exam result decleared