
मिरज : सामाजिक प्रबोधनपर आकर्षक देखावे व फुलांनी सजवलेल्या चित्ररथांसह मुस्लिम बांधवांच्या अलोट गर्दीत आज मोहरमची सांगता झाली. यंदा दणदणाट करणाऱ्या ध्वनी यंत्रणेला फाटा देत सामाजिक प्रबोधनावर भर देत मिरवणुकीने ताबूत विसर्जन झाले. ताबूतासह निघालेल्या फेऱ्या जवाहर चौकातून, बसवेश्वर चौक आणि शास्त्री चौक येथून मिरासाहेब दर्ग्याकडे मार्गस्थ झाल्या, दरम्यान मोहरम मंडळांकडून आणि विविध सामाजिक संघटनांकडून फेरी मार्गावर सरबताचे वाटप करण्यात आले.