
Sangli Crime
शिराळा : बेलदारवाडी (ता. शिराळा) येथील बोकड चोरीप्रकरणी अटक केलेल्या इब्राहिम अब्बासअली शेख (वय २५, रा. सूर्यवंशी मळा, कराड) यांच्यावर घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे शिराळा पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहेत.तो वडूज, विटा, चिंचणी, वांगी, कराड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ८ घरफोडी प्रकरणात संशयित आरोपी असल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. बोकड व पाट चोरी प्रकरणी ज्ञानदेव विठोबा शेवाळे (वय ५३, रा. बेलदारवाडी) यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली होती.