मुंबईत उपचाराला जाणाऱ्यांना निवारा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

कोल्हापूर - उपचारासाठी मुंबईत जाणे म्हणजेच एक व्याप आणि त्यात मुंबईत गेल्यावर रुग्ण, नातेवाइकांची राहण्याची सोय करणे म्हणजे त्याहून मोठा व्याप; पण अनेक वेळा अपरिहार्यता असते आणि अक्षरशः कसरत करत मुंबईत राहावे लागते; पण आता कोल्हापुरातून मुंबईत वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्यांची चांगली सोय झाली आहे. चैतन्य प्रतिष्ठान व सावली केअर सेंटतर्फे मुंबईत रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी निवास व्यवस्था सज्ज केली आहे. महात्मा फुले रोड, नायगाव दादर येथे ही निवास व्यवस्था आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.  मुंबई महापालिकेचे वैद्यकीय शिक्षण व रुग्णालय संचालक डॉ. अविनाश सुपे व अंजली पाटील यांच्या हस्ते या निवास व्यवस्थेचे काल उद्‌घाटन झाले.

उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या २० रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाइकांसाठी असे मिळून साठ जणांची येथे सोय आहे. त्यांच्याकडून अत्यल्प शुल्क आकारण्यात येणार आहे. ही निवास व्यवस्था वातानुकूलित तर आहेच; पण तेथे तात्पुरत्या वैद्यकीय उपचाराचीही सोय आहे.

नायगाव-दादर भागात व्यवस्था
मुंबईत रुग्णांचे व त्यांच्या नातेवाइकांचे राहण्याची व्यवस्था नसल्याने हाल होतात. काही जणांचे नातेवाईक मुंबईत असतात; पण मुंबईतील जागेची स्थिती पाहता तेथे रुग्णांना काही दिवसांसाठी राहणे सोयीचे होऊ शकत नाही. 

काही जणांची व्यवस्था होते; पण ती खूप लांब असते. त्यामुळे टॅक्‍सी, लोकल, बेस्टचा प्रवास करावा लागतो. सोबत रुग्ण असताना असा प्रवास खूप अडचणीचा होतो.

या पार्श्‍वभूमीवर मुंबईत नायगाव-दादर अशा मध्यवर्ती भागात ही निवास व्यवस्था आहे. 

कोल्हापुरातून जाणाऱ्यांनी अगोदर संपर्क करून गेल्यास तेथे राहता येणार आहे. त्यासाठी (९७६९५६८२८३ विकास देशमुख) हा संपर्क क्रमांक आहे.

Web Title: mumbai hospital treatment patient residence