
जत : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात सहभागी महाराष्ट्रातील हजारोच्या संख्येने दाखल मराठा बांधवांना जेवण घेऊन निघालेली वाहने पोलिसांनी रोखली. यावर माजी आमदार विक्रम सावंत यांचा पोलिसांना जाब विचारत आक्रमक पवित्रा घेतला.