बेवारस वाहनांच्या तक्रारीसाठी महापालिकांत कक्ष; शासन आदेश

Municipal chamber for unknown vehicles complaint Government Order
Municipal chamber for unknown vehicles complaint Government Order

सोलापूर - महापालिका क्षेत्रातील बेवारस वाहनासंदर्भात आलेल्या तक्रारींसाठी आता राज्यातील महापालिकांत यंत्रणा उभारली जाणार आहे. निनावी तक्रारींचीही दखल या नियंत्रण कक्षात घ्यावी लागणार आहे. 

महापालिकेच्या मालमत्ता असलेल्या परिसरात तसेच रस्त्यावर बेकायदेशीरपणे सोडून दिलेल्या वाहनासंदर्बात नियंत्रण कक्ष सुरु करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक महापालिकेला ही यंत्रणा उभारावी लागणार आहे. शिवाय उपायुक्तापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याकडे त्याची जबाबदारी असणार आहे. 

बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन आणि स्थानिक पोलिस विभागाशी चर्चा करून कालबद्ध धोरण निश्चित केले जाईल व त्यानुसार कार्यवाही करावी लागणार आहे. आलेल्या तक्रारींची माहिती त्वरीत पोलिस विभागाला देण्यात येणार आहे. महापालिकांना निश्चित केलेल्या धोरणानुसार या वाहनांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. 

  • तक्रार नोंदविण्यासाठीची सुविधा -

टोल फ्री क्रमांक, व्हॅाटसअॅप, मेसेज किंवा ईमेल द्वारे नागरिकांना तक्रार नोंदविता येणार आहे. बेवारस वाहनांमुळे रहदारीला अडथळा येतो. स्वच्छता व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या याचिकेवर
न्यायालयाने हे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकांना कार्यवाही करावी लागणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com