दुर्गा मुर्तींच्या विसर्जनात पालिकेची बत्ती गायब 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

कऱ्हाड : येथे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दुर्गा विसर्जनास पालिकेने घाटावर कृष्णा नदीच्या काठावर प्रकाशाची काहीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांना अंधारात चाचपडत दुर्गा देवीच्या मुर्तींचे विसर्जन करावे लागत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दुर्गा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. 

प्रथेप्रमाणे दसरा व त्याच्या दुसऱ्या दिवशी दुर्गा देवी मुर्तीचे विसर्जन केले जाते. सलग दोन दिवस अंधारात चाचपडत व मोबाईलच्या उजेडाचा आधार घेत कार्यकर्त्यांना दुर्गा देवीच्या मुर्तींचे विसर्जन करावे लागत आहे. रात्री विसर्जन होत असल्याची माहिती असूनही पालिकेकडून कृष्णा घाटावर कसलीही सुरक्षा अथवा प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली नाही. कृष्णा घाटावर विसर्जनासाठी आलेल्या मंडळांना दिवाबत्तीची सोय नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना अंधारातच मूर्ती विसर्जन करावे लागत आहे.

उजेडासाठी दुचाकी, ट्क्टर तर काही जण मोबाईलचा आधार घेवून मूर्ती नदीपात्रामध्ये विसर्जन करत होते. प्रत्येकाला अंधाराचा सामना करावा लागत होता. प्रत्येकाच्या तोंडात एकच चर्चा होती दुर्गा देवीत पालिकेची बत्ती गायब आहे. त्याचबरोबर पोलिस प्रशासन सुरक्षा व्यवस्था मोजकीच होती. दिवाबत्तीची सोय नसल्यामुळे मंडळांना समस्यांना तोंड देत अंधारातच मूर्ती विसर्जन करावे लागले.

Web Title: Municipal corporation didnt provide electricity on Godavari ghat