
Sangli Crime news : नगरपरिषदेतील एका कर्मचाऱ्याने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रकाश कामगोंडा नागराळे (वय ३५, पत्रकारनगर, जत) असे मृताचे नाव आहे. आज ही घटना उघडकीस आली. या घटनेची जत पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.