नागरिकांच्या योगदानामुळे नगरपालिकेला निधी

हुकूम मुलाणी
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मंगळवेढा : सर्वेक्षण 2018 अंतर्गत शहरातील नागरिकांच्या सहभागातून चांगले योगदान दिल्यामुळे राज्यातील 366 नगरपलिकेतून 58 नगरपालिका यासाठी पात्र ठरल्या असून यामध्ये मंगळवेढा नगरपलिकेचा समावेश आहे. यामुळे पालिकेला विविध विकासकामासाठी दोन ते चार कोटीचा निधी मिळणार आहे.

मंगळवेढा : सर्वेक्षण 2018 अंतर्गत शहरातील नागरिकांच्या सहभागातून चांगले योगदान दिल्यामुळे राज्यातील 366 नगरपलिकेतून 58 नगरपालिका यासाठी पात्र ठरल्या असून यामध्ये मंगळवेढा नगरपलिकेचा समावेश आहे. यामुळे पालिकेला विविध विकासकामासाठी दोन ते चार कोटीचा निधी मिळणार आहे.

यामध्ये नगरपलिकेने भाग घेवून नागरिकांना अ‍ॅपच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी तक्रार दाखल करण्याची सुविधा दिली. या सर्वेक्षणात शासनाच्या सुचनेनुसार शहरातील दोन टक्के नागरिकांनी हे अ‍ॅप वापरणे आवश्यक होते. पण पालिकेने यात चांगले प्रबोधन केल्यामुळे यात शहरवासीयांनी मोठा सहभाग घेतला. शहरातील भिंती चांगल्या विचाराने बोलू लागल्या. पालीका इमारत व बसस्थानकाचे रूप बदलले. शहरातील भिंतीवर विचार आणि संत वचने दिसू लागल्याने संत नगरी असल्याचे वाटू लागले.

प्रमुख रस्ते व ठिकाणाची माहिती देणारे फलक लावले. स्वच्छतेसाठी 9 प्रकारच्या तक्रारीसाठी अ‍ॅपची सुविधा नगरपलिकेने उपलब्ध करुन दिली दाखल तक्रारीमध्ये मृत तक्रारी नोंदवल्या जनावराची विल्हेवाट लावणे, तक्रारी, कचरा साफ करणे, कचऱ्याचे ढिग हलविणे, घंटा गाडी न येणे, रस्ता साफसफाई, सार्वजनिक शौचालयात दिवाबत्तीची सोय नसणे, सार्वजनिक शौचालयात पाण्याची सोय नसणे, शौचालय खराब असणे, शौचालय स्वच्छ नसणे, या दाखल तक्रारीची तात्काळ निपटारा केला. याशिवाय विविध प्रकारच्या चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सांस्कृतीक कार्यक्रम, डस्टबीनचे वाटप करुन त्यातून कंपोष्ट खत तयार केले यासाठी नगराध्यक्षा अरुणा माळी उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पक्षनेते अजित जगताप, अनिता नागणे, तत्कालीन मुख्याधिकारी डॉ निलेश देशमुख सह पालिकेचे नगरसेवक, अधिकारी, कर्मचारीसह नागरिकांनी उत्फुर्त सहभाग घेतल्यामुळे बक्षिस रुपाने हा निधी शासनाकडून मिळणार आहे. 

सर्वेक्षण 2018 मध्ये शहरवासीय सहकार्यामुळे 58 न.पा.मध्ये पात्र ठरली यामधून मिळणाय्रा अनुदानातून नवीन विकासकामे घेता येणार आहेत. 
-अरुणा माळी नगराध्यक्षा,

नपाचे पदाधिकारी व अधिकारी, कर्मचारी, सामाजीक संस्था, विशेषता तत्कालीन मुख्याधिकारी देशमुख यांचे यासाठी मोलाचे सहकार्य मिळाले म्हणून पालिकेचा समावेश झाल्याने अनुदानास पात्र ठरली यामधील स्वच्छतेविषयी झालेल्या कामात पुढे सातत्य ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहोत 
- अजित जगताप पक्षनेते

Web Title: Municipal council fund due to the contribution of citizens