आला रे आला...शिवसेनेचा वाघ आला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

सांगली - ‘आला रे आला...शिवसेनेचा वाघ आला’, ‘जय भवानी-जय शिवाजी’ अशी जोरदार घोषणाबाजी आणि समर्थकांच्या शिट्या, टाळ्यांच्या गजरात आज खास सेना स्टाईलने इच्छुकांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली. 

येथील मार्केट यार्डातील वसंतदादा पाटील सभागृहात सेनेच्या वतीने मुलाखती पार पडल्या. जिल्हाप्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, नगरसेवक शेखर माने, नगरसेवक गौतम पवार, नगरसेवक शिवराज बोळाज, नगरसेविका अश्‍विनी कांबळे, बजरंग पाटील, दिगंबर जाधव, रावसाहेब घेवारे, रावसाहेब खोचगे, सुनीता मोरे आदींची उपस्थिती होती.

प्रभाग क्रमांक १२ पासून मुलाखतीस प्रारंभ झाला. काही इच्छुकांनी आजवर भगव्यासाठी रक्त सांडले, लाठ्याकाठ्या खाल्ल्या असल्याचा दाखला देत उमेदवारीची मागणी केली. प्रभागातील अनेक प्रश्‍न प्रलंबित असून ते सोडवण्यासाठी उमेदवारी द्या. विद्यमान नगरसेवकांनी कोणताच विकास केला नसल्याचे सांगून काहींनी उमेदवारीवर दावा सांगितला. क्रीडा मंडळाच्या माध्यमातून उपक्रम राबवल्याचे सांगूनही अनेकांनी उमेदवारीवर हक्क सांगितला. पक्षाच्या प्रामाणिकपणाची उदाहरणे देऊनही काहींनी उमेदवारी मागितली.

उमेदवारीसाठी इच्छुकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. फटाक्‍याची आतषबाजी करत काहींनी आगमनाची वर्दी दिली. तसेच इच्छुक माईकचा ताबा घेण्यापूर्वी समर्थकांनी ‘आला रे आला वाघ आला...शिवसेनेचा वाघ आला’, ‘जय भवानी...जय शिवाजी’ अशा जोरदार घोषणा देऊन समर्थकांनी सभागृह दणाणून सोडले. इच्छुकाच्या भाषणावेळी अधून-मधून शिट्या आणि टाळ्यांचा पाऊस पाडत भगवे झेंडे फडकावले जात होते. इच्छुक महिला आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीने सभागृह भरले होते.

इच्छुक उमेदवार आणि समर्थकांच्या गर्दीमुळे सभागृह भरले होते. तसेच रस्त्यावरही गाड्यांची गर्दी दिसली. भगवे झेंडे, मफलर, टोप्या यामुळे परिसर भगवामय झाल्याचे चित्र दिसले. उत्साही समर्थकांनी दुचाकीच्या पुंगळ्या काढून रस्त्यावरून गोंगाट केला. उघड्या जीपमधून आणि दुचाकी रॅलीकाढून दोन इच्छुकांनी मिरवणुकीने शक्तीप्रदर्शन केले. गर्दीमुळे पोलिस बंदोबस्तही तैनात होता.

१३ प्रभागासाठी मुलाखती-
आज सांगलीतील ११ आणि मिरजेतील दोन अशा १३ प्रभागासाठी सायंकाळपर्यंत मुलाखती पार पडल्या. १३ प्रभागासाठी १०८ जणांनी मुलाखती दिल्या. उर्वरीत प्रभागासाठी मंगळवारी (ता.४) मिरजेत मुलाखती होतील.

उपस्थित असूनही मुलाखत नाही-
मुलाखतीसाठी नगरसेवक शिवराज बोळाज, माजी नगरसेवक संतोष देवळेकर उपस्थित होते. मात्र त्यांनी मुलाखत न दिल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. मुलाखत न देण्याबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे.

Web Title: municipal election shivsena interview politics