मनपाची डिजिटायजेशनच्या दिशेने पावले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

अंदाजपत्रकात मोबाइल ॲप, रेकॉर्ड डिजिटायजेशन, ई-ऑफिसवर भर

कोल्हापूर - महापालिकेने २०१७-१८ साठीच्या अंदाजपत्रकात पाणी बिल आकारणीसाठी स्पॉट बिलिंग योजना, रेकॉर्ड डिजिटायजेशन,  ई ऑफिस प्रणाली, घरफाळा मिळकतीचे जीआयएस सर्वेक्षण, ई गव्हर्नन्स स्मार्ट सुविधा, ऑनलाइन पेमेंट अशा सुविधांचा समावेश आहे. या योजनांच्या माध्यामातून महापालिकेने डिजिटालायजेशनच्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात केली आहे.

रोड मॅनेजमेंट सिस्टीम, प्रधानमंत्री आवास योजना, अमृत योजनेतून ड्रेनेजलाइन योजना हेच यंदाच्या अंदाजपत्रकाचे वैशिष्ट्य आहे. यंदाच्या वर्षात महसुली व भांडवली जमा रक्कम ५१९ कोटी ७५ लाख ३६ हजार ९६ रुपये इतकी अपेक्षित असून, खर्च ५१९ कोटी ४८ लाख ९ हजार इतका आहे. जमेतून खर्च वजा जाता २७ लाख २७ हजार रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आहे. महसुली व भांडवली जमा, वित्त आयोगाकडून येणारा निधी व विशेष प्रकल्प असा १०४७ कोटी ७५ लाख ३५ हजार रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे.

अंदाजपत्रकाची वैशिष्ट्ये
महापालिकेने गतवर्षी सेफसिटी प्रकल्पावर ७ कोटी ५० लाख रुपये खर्च केले आहेत. महापालिका व जिल्हा नियोजन मंडळातून हा निधी खर्च केला. या प्रकल्पासाठी टप्पा २ यंदा कार्यान्वीत केला जाईल. त्यासाठी व्हिडिओ सर्व्हिलन्स सिस्टम, इमर्जन्सी व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम, पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, पोलिस एम बीट सिस्टीम, ट्रॅफिक एम चलन सिस्टीम, व्हिझिटर इन्फॉरमेशन मॅनेजमेंट सिस्टीम, डायल १०० प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तसा प्रकल्प यंदा प्रस्तावित आहे. त्यासाठी १४ कोटींची तरतूद केली जाणार आहे.

Web Title: municipal go to digitisation