महापालिकेच्या दवाखान्यात चार जन्मजात बाळांना जीवनदान 

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 10 एप्रिल 2018

सोलापूर - जन्मलेल्या बाळाला श्‍वास घेण्यासाठी अडचण येत असताना न्यूओनेटर रेस्पायरेटर यंत्राचा वापर करून चार बाळांना जीवनदान देण्यात यश आल्याचे महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी "सकाळ'ला सांगितले. 

जन्मलेल्या बाळास त्रास होत असेल तेंव्हा कृत्रिम श्‍वाच्छोश्‍वास देण्याची यंत्रणा महापालिकेच्या प्रसुतीगृहात काही दिवसापुर्वीच बसविण्यात आली आहे. अहिल्यादेवी होळकर, बॉईस आणि जिजामाता प्रसुतीगृहात ही सुविधा करण्यात आली आहे. 

डॉ. नवले म्हणाले, 'न्यूयोनेटल रेस्पायरेटर असे या यंत्राचे नाव आहे. एखाद्या बाळाला जन्मतःच श्‍वास घेण्याचा त्रास होऊ लागला किंवा त्याला श्‍वास घेता येत नसेल तर या उपकरणाचा वापर करून त्याच्यावर उपचार करता येणार आहे. त्यानुसार या चार बालकांसाठी त्याचा वापर करण्यात आला. हे उपचार पूर्णपणे मोफत करण्यात आले आहेत. '' 

महापालिकेच्या काही प्रसुतीगृहांमध्ये कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया बंद होत्या. त्या पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. भावनाऋषी प्रसुतीगृहात 1972 पासून, चाकोते प्रसुतीगृहात 2003 पासून, बॉईसमध्ये 2013 पासून शस्त्रक्रिया करणे बंद होते. त्या ठिकाणी आता शस्त्रक्रिया सुरु करण्यात आल्या आहेत. रामवाडी प्रसुतीगृहातही लवकरच त्या सुरु होतील, असेही डॉ. नवले म्हणाले.

Web Title: municipal hospital born baby life saving