सोलापुरात कोट्यवधीच्या जागा लाटल्या नाममात्र दराने 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 4 जुलै 2018

सोलापूर - कोट्यवधी रुपये किंमत होऊ शकते अशा जागा अक्षरशः मातीमोल किमतीने भाड्याने घेत काही दिग्गजांनी त्या लाटल्या आहेत. महापालिकेने ठराव करून दिला असल्याचे कारण देत या मालमत्तांवर अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. 

सोलापूर - कोट्यवधी रुपये किंमत होऊ शकते अशा जागा अक्षरशः मातीमोल किमतीने भाड्याने घेत काही दिग्गजांनी त्या लाटल्या आहेत. महापालिकेने ठराव करून दिला असल्याचे कारण देत या मालमत्तांवर अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. 

महापालिकेच्या कोणत्याही जागा भाड्याने किंवा विकत देताना त्याची किंमत बाजारमूल्यापेक्षा कमी असता कामा नये, अशी अधिनियमात तरतूद आहे. मात्र, सत्तेचा वापर करीत कोट्यवधीच्या जागा लाटण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे असे ठराव आयुक्तांनी फेटाळून लावणे आवश्‍यक असताना तत्कालीन आयुक्तांनी एकही ठराव फेटाळला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एखाद्या गरिबाला गाळ्यासाठी जागा देण्याचा ठराव झाला तर त्याला बाजारभावाचा अभिप्राय देणारे प्रशासनाने दिग्गजांच्या ठरावावेळी गांधारीची भूमिका का घेतली हे न उलगडणारे कोडे आहे. सोलापूर सोशल स्पोर्टस असोसिएशनला रविवार पेठ परिसरातील सहा हजार 300 चौरस फूट जागा दरमहा नाममात्र एक रुपयाने भाड्याने दिली आहे आणि त्याची मुदत 2022 पर्यंत आहे. अशाच अनेक जागा राजकीय वजन वापरून लाटण्यात आल्या आहेत. महापालिकेने भाड्याने दिलेल्या जागांची यादी पाहिली आणि त्यातील दिग्गजांनी लाटलेल्या जागा पाहिल्या तर सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होतील. जागांचे क्षेत्रफळ व त्याला असलेले भाडे आणि नाममात्र भाड्याने देण्याचा कालावधी पाहिला तर संबंधितांच्या एक-दोन पिढ्या काहीही न करता त्या मालमत्तेवर मिळणाऱ्या उत्पन्नावर सुखा-समाधानाने जगू शकेल हे स्पष्ट होईल. बहुतांश मिळकतींची मुदत संपली आहे, तरीसुद्धा महापालिकेने अद्याप त्या परत घेतल्या नाहीत हेही धक्कादायकच आहे. 

संस्था जागा चौ. फू. दरमहा भाडे रुपयांत 
सोलापूर स्पोर्टस 6300 01 
इंडियन वेल्फेअर 13800 1945 
तिबेटीयन संस्था 1660 2994 
राघवेंद्र क्रीडा मंडळ 200 880 
इकरारअली सोशल 1480 1500 
बेरिया ट्रस्ट 360 51(वार्षिक)

Web Title: municipal place minimum rent