महापालिका घरपट्टीची बिले आता ऑनलाईन...संकेतस्थळावर बिले मिळणार

बलराज पवार
Sunday, 20 September 2020

सांगली-  महापालिकेने कोरणा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घरपट्टीची बिले आता ऑनलाईन उपलब्ध केली आहेत. तीच बिले मिळाली असल्याचे समजून नागरिकांनी ऑनलाईन भरावी असे आवाहन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. 

सांगली-  महापालिकेने कोरणा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घरपट्टीची बिले आता ऑनलाईन उपलब्ध केली आहेत. तीच बिले मिळाली असल्याचे समजून नागरिकांनी ऑनलाईन भरावी असे आवाहन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. 

गेले सहा महिने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचा कारभार ठप्प आहे. कर वसुलीही होत नाही. महापालिकेचे कर्मचारी कोरोनाच्या महामारीत विविध ठिकाणी गुंतल्यामुळे यंदा बिलेही वाटप झालेली नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. यावर आयुक्त नितीन कापडणीस यांनी मार्ग शोधला असून मालमत्ता (घरपट्‌टी) विभागाची 2020-21 बिले महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पेपरलेस ऑफिस आणि ई गव्हर्नन्सला चालना मिळण्याच्या हेतूने बिले वाटप आणि कर वसुली ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

आयुक्त कापडणीस यांनी सांगितले की, महापालिकेची सन 2020-21 ची मालमत्ता कराची बिले महापालिकेच्या www.smkc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहेत. नागरिकांनी महापालिकेच्या संकेतस्थळावर पे ऑनलाईनमध्ये घरपट्‌टी विभागात आपला मिळकत क्रमांक टाकल्यास बिल मिळेल. ते प्राप्त करुन घ्यावे. आता स्वतंत्र बिले दिली जाणार नाहीत. त्यामुळे हीच बिले नागरिकांना प्रदान झाले असे समजून ती ऑनलाईन भरावित. वरील पध्दतीने संकेतस्थळावर बिल दिसल्यावर त्याच्या पुढे पे ऑनलाईनवरुन हे बिल भरता येणार आहे. त्यानुसार आपली बिलाची रक्कम भरावी असे आयुक्त कापडणीस म्हणाले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal real estate bills are now online. Bills will be available on the website