Belgaum : विहिरीत तरंगत होता शीर नसलेला मृतदेह, पोलिसांना घातपाताचा संशय

Belgaum Crime News
Belgaum Crime Newsesakal
Summary

विहिरीत शीर विरहित धड आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडालीय.

बेळगांव : शीर धडावेगळे करण्यात आलेला मृतदेह मुतगे (Belgaum District) येथील विहिरीत आढळून आला आहे. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली असून मारिहाळ पोलिसांनी (Marihal Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास चालविला आहे.

माजी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर यांच्या शेतातील विहिरीत शीर नसलेला मृतदेह तरंगताना सकाळी सातच्या दरम्यान काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यामुळं त्यांनी ही माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर सुनील अष्टेकर यांनी विहिरीकडं धाव घेऊन पाहणी केली.

Belgaum Crime News
VIDEO : पंजाबी गायकाच्या हत्येनंतर मारेकऱ्यांचं जोरदार सेलिब्रेशन

ही माहिती मारिहाळ पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक महांतेश बसापुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अंदाजे ३० वर्षे वयोगटातील तरुणाचा हा मृतदेह असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. पोलिसांनी शीर शोधण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com