
इटकरे : पाहुण्यांच्या घरी आलेल्या मामा आणि भाच्यात झालेल्या जुन्या भांडणातून मामाने भाच्याचा खून केल्याची घटना कुंडलवाडी (ता. वाळवा) येथे शुक्रवारी रात्री उशिरा घडली. सिद्धेश्वर सीताराम काळे (रा. वाळूज, ता गंगापूर, जि. संभाजीनगर) असे मृताचे नाव आहे. संशयित वारलेस हिवराज पवार (रा. वाळूज, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर) याला कुरळप पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आदर्श अमर काळे (रा. कुंडलवाडी) यांनी फिर्याद दिली.