सांगलीत तरुणाचा खून, तिघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

सांगली - कुपवाडमध्ये बुधवारी रात्री अखिलेश सैफअली सरदार मगदुम ( वय 22, रा. दत्तनगर, बामणोली ) या तरुणावर खूनी हल्ला झाला होता. आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. उदय चित्राळे, गणेशदुधाळ, बट्टा अशी त्यांची नावे असून आणखी एका अनोळखी व्यक्तीवर कुपवाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी ( ता. 12 ) रात्री नऊच्या सुमारास सैफअलीवर खुनी हल्ला झाला होता. पंधरा दिवसांपुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन सैफअलीला लाकडी दांडक्‍याने मारहाण केली होती; तसेच चाकुने भोसकले होते. संशयितांनी मायाक्कानगरमध्ये सैफअलीला पकडले. जबरदस्तीने दुचाकीवर बसूवन कुपवाडमध्ये अजिंक्‍यनगरमध्ये नेले. काठीने डोक्‍यावर, छातीवर, पाठीवर आणि मानेवर जोरदार मारहाण केली. तो मेला असे वाटल्याने तेथून हल्लेखोरांनी पळ काढला. 

पोलिसांनी सैफअलीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते; आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी साजीद सरदार मगदुम ( बामणोली ) यांनी तक्रार दिली आहे.

Web Title: Murder in Sangli Three arrested