नगर जिल्ह्यात डॉक्‍टरचा अनैतिक संबंधातून खून 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

श्रीगोंदे - कौठे येथील डॉ. विपुलचंद्र डे (वय 45, कौठे, मूळ. कोलकाता) यांचा काल (मंगळवारी) रात्री अनैतिक संबंधातून डोक्‍यात दगड घालून खून करण्यात आला. पोलिसांनी या गुन्ह्यात संभाजी थोरात (वय 40, कौठे) याला आज अटक केली. 

कौठे येथे 20 वर्षांपासून डॉ. डे छोटा दवाखाना चालवत होते. काल सायंकाळी ते शेतात गेले. मात्र, रात्री उशिरापर्यंत परतले नाहीत. काही गावकऱ्यांना ओढ्याजवळ गव्हाच्या काडात लपविलेला डे यांचा मृतदेह आज सकाळी सापडला. पोलिसांच्या श्‍वानाने संभाजी थोरात याच्या घरापर्यंत माग काढला. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याने डॉ. डे यांचा दगडाने ठेचून खून केल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला अटक करण्यात आली. 

Web Title: Murder sexual transmitted doctor Nagar district

टॅग्स