श्रीरामपुरात तृतीयपंथीयाचा खून 

सुनील नवले
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

आजारपणामुळे त्याची प्रकृतीही खालावली होती. 17 ऑक्‍टोबर रोजी तो बाजार समिती परिसरात जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या डोक्‍याला मोठी जखम होती. त्यामुळे त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

श्रीरामपूर : बाजार समितीच्या आवारात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या अश्‍विनी नूरजहॉं शेख (वय 45, रा. श्रीरामपूर) या तृतीयपंथीयाचा आज नगर येथील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या खबरीवरून श्रीरामपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी, की अश्विनी शेख याचे प्रवरा कालव्याच्या कडेला असलेल्या झोपडपट्टीत घर आहे. दुर्धर आजाराने त्रस्त असल्याने तो कॉंग्रेस भवन परिसरात आपल्या सहकाऱ्यांसोबत राहत होता. आजारपणामुळे त्याची प्रकृतीही खालावली होती. 17 ऑक्‍टोबर रोजी तो बाजार समिती परिसरात जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या डोक्‍याला मोठी जखम होती. त्यामुळे त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

अवश्‍य वाचा बाजार समितीला "दादा पाटलां'चे नाव 

वैद्यकीय अहवालावरून खुनाचा गुन्हा 
या प्रकरणी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्याचा मृत्यू कशाने झाला याचा वैद्यकीय अहवाल डॉक्‍टरांकडून मागविण्यात आला होता. हा अहवाल नुकताच प्राप्त झाला. अहवालावरून अज्ञात व्यक्तीने काहीतरी टणक वस्तूने डोक्‍यात मारहाण केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार काल (ता. 29) शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल नोंदविण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार सुरेश मुसळे करीत आहेत. 

हेही वाचा थरार... द बर्निंग ट्रक 
 

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले 
डोक्‍यात टणक वस्तूने मारहाण झाल्याने अश्विनी शेख याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. या प्रकरणी शेखच्या सहकाऱ्यांचे जबाब, तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून या घटनेचा तपास केला जात आहे. 
- संभाजी पाटील, सहायक पोलिस निरीक्षक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder in Shrirampur