साक्षीदारच निघाला खुनी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पाथर्डी - चिचोंडी येथील केशव दशरथ जऱ्हाड (वय 50) यांच्या खून प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. जऱ्हाड यांच्या खुनाची माहिती नातेवाइकांना देणारा साक्षीदारच खुनी असल्याचे पोलिस तपासात समोर आले. अरुण हरिभाऊ तुपे (वय 40, रा. चिचोंडी) असे त्याचे नाव आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे संशयित म्हणून अटक केलेल्या संजय पेंटर यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

चिचोंडी येथे 23 जुलै 2018 रोजी सायंकाळी सहा वाजता केशव जऱ्हाड यांचा खून झाला. याबाबत प्रमोद जऱ्हाड यांनी फिर्याद दिली. फिर्यादी, आरोपी व साक्षीदारांच्या जबाबात तफावत आढळत होती. पोलिसांनी साक्षीदार अरुण तुपे याची कसून चौकशी केल्यानंतर त्यानेच हा खून केल्याचे समोर आले. तुपे यास जऱ्हाड यांचा खून करताना संजय पेंटर याने पाहिले होते. त्यामुळे तुपे याने संजय पेंटरच्या घरात घुसून त्याच्यावरही चाकूहल्ला केला.

Web Title: Murder Wintess Crime

टॅग्स