मुश्रीफच आमचे ‘ए प्लस’ दर्जाचे शत्रू - प्रा. संजय मंडलिक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

म्हाकवे - माझा एक नंबरचा शत्रू आमदार हसन मुश्रीफ असून, शत्रूमध्ये त्यांना ‘ए प्लस’ दर्जा आहे. कोण, कुठे, कोणाला कार्यक्रमानिमित्त भेटले म्हणून युती होत नाही, असे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी स्पष्ट केले. तर शिवसेनेत मी सुखी व सुरक्षित आहे. माझे कार्यकर्ते शिवसेनेशीही एकरूप आहेत. पक्षश्रेष्ठींकडूनही माझा आदर होतो. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही, असा खुलासा माजी आमदार संजय घाटगे यांनी केला. प्रा. मंडलिक व संजय घाटगे यांनी आम्ही शिवसेना म्हणून एकसंध आहोत याचा पुनरुच्चार केला.  

व्हन्नाळी (ता. कागल) येथे संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. प्रा. संजय मंडलिकांचे आमदार हसन मुश्रीफांशी गुफ्तगू आणि संजय घाटगेंच्या भाजप प्रवेशासंदर्भात उठलेल्या वावड्यांच्या पार्श्‍वभूमीवर ते दोघे बोलत होते. 

श्री. मंडलिक व घाटगे म्हणाले, ‘‘विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते, ऐकायला मिळते अशा बातम्या पसरवून जनतेचा बुद्धीभेद केला जात आहे. परंतु, शिवसेनेच्या विरोधात जे कोणी उभे राहतील त्यांच्या विरोधात आम्ही दोघेही शिवसेना म्हणून एकदिलाने लढू. यासाठी शेतकरी संघटनाही आमच्या सोबत घेणार आहे. याचाच एक भाग म्हणून ५ फेब्रुवारीला समृद्धी दूध संघाच्या कार्यस्थळावर भव्य मेळावाही घेणार आहोत. 

प्रा. मंडलिक म्हणाले, ‘‘आता कुणाबरोबर युती करायची गरज नाही. संजय घाटगे आमदार आणि मी खासदार झाल्याशिवाय कागलचा विकास होणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अशा अफवांना बळी पडून चर्चा करीत बसू नये. पालिका निवडणुकीत मुश्रीफांसोबत एक चंद्रकांत गवळी आणि दोन कर्मचारी तेवढेच गेले. उर्वरित कार्यकर्ते प्रामाणिकपणे समरजितसिंह घाटगे यांच्या सोबत राहिले. तरीही त्यांनी स्वतंत्रपणे मुरगूडमध्ये उमेदवार उभे केले.

माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, ‘‘दिवंगत खासदार मंडलिकांना दिलेल्या शब्दानुसार मी प्रा. मंडलिकांच्या सोबतच राहीन. परंतु, मुलाला राजकारणात सुरक्षित करण्यासाठी मी राजकारण करीत नाही. मुलाच्या हितासाठी कुणाच्या तुपातले उष्टे मी खाणार नाही.  

त्यांचे गुण बघूनच सोडले
आमदार हसन मुश्रीफ सभा, बैठकांमधून आपल्याला एकटे पाडल्याचे सांगत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुश्रीफांच्या सोबत आतापर्यंत आम्ही आणि घाटगेंनी युती करून बरेच काही सोसले आहे. दिवंगत मंडलिकांना मुश्रीफांनी दिलेला त्रास जगजाहीर आहे. म्हणून त्यांचे हे गुण पाहून त्यांना सोडले असल्याचे मंडलिकांनी स्पष्ट केले.

म्हणूनच जिल्हा बॅंकेत गेलो
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवेळी सर्वपक्षीय युतीतून मुश्रीफांसोबत जाण्यासाठी मी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या गटाच्या नोकरी असलेल्या कार्यकर्त्यांना बदल्यांचा त्रास होतो. शिवाय सेवा संस्थाही अडचणीत येतात. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या हितासाठी बॅंकेत जाण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत सुमारे ४०० मतांपैकी ३७५ मते मला पडली. ही सगळीच मते मुश्रीफांची नाहीत, असे मंडलिक यांनी सांगितले.

Web Title: mushrif is our a plus enemy