'आमच्यामुळेच बाबा बनले मुख्यमंत्री '

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 सप्टेंबर 2016

सातारा - राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेले पृथ्वीराज चव्हाण आता आमच्याच पक्षाला "टार्गेट‘ करत आहेत. आमचा पाठिंबा नसता तर उभ्या आयुष्यात ते मुख्यमंत्री झाले नसते. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच साताऱ्याचे मेडिकल कॉलेज गेले, असा घाणाघाती आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील भाजप सरकारला जागे करा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाटखळ येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यकर्ता व शेतकरी मेळाव्यात श्री. पवार बोलत होते. 

ते म्हणाले, ""अलीकडे काही कारण नसताना बाबांकडून राष्ट्रवादीला टार्गेट केले जात आहे. राष्ट्रवादीने पाठिंबा दिला नसता तर ते मुख्यमंत्री झाले नसते. त्यांना आमच्या श्रीनिवास पाटील यांनी चारीमुंड्या चित केले होते. आता तर ते संजय देसाईंच्या मागे लागले आहेत. साताऱ्याला आम्ही सहाशे कोटींचे मेडिकल कॉलेज देण्याचा निर्णय घेतला. ते मंजूर झाले. पहिले मुख्यमंत्र्यांचे नंतर उपमुख्यमंत्र्यांचे म्हणून बारामतीला दिले. साताऱ्यासाठी कोरेगाव रस्त्याच्या कडेची पाटबंधारे विभागाची जमीन देण्याचे ठरविले. गोरगरिबांची मेरिटची मुले येथे शिकतील, अशी त्यामागची भावना होती. पण, बाबांच्या नाकर्तेपणामुळे हे मेडिकल कॉलेज परत गेले.‘‘ माणसाच्या कर्तृत्वावर व निर्णय क्षमतेवर सर्व काही अवलंबून असते, असे सांगून ते म्हणाले, ""आपल्याकडे शेतीसाठी बैल राहिलेले नाहीत. पूर्वी दोन, चार बैलांची नांगरट होती. अंगावर कासरा पडू देत नाही तो चलाख बैल; पण काही बैल हाकणारा शेपटीला चावला तरी हालत नाहीत. तो डुगुडुगु चालतो, असे म्हणताच एकच हश्‍या पिकला. यावर श्री. पवार यांनी "मी हे कोणाचे नाव घेऊन बोललो नाही. एक उदाहरण सांगितले,‘ अशी पुष्टी जोडली. 

अजित पवार म्हणाले...
- सध्या रक्षकांवरच हल्ले होत आहेत
- दुष्काळनिवारण राहिले बाजूलाच
- सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे.
 
शाल, गाय ओळखीची झाली...
कार्यक्रमात अनेकांचे सत्कार झाले. तोच तोच बुके व शाल पुन्हा पुन्हा येत होती. याचा उल्लेख अजित पवार यांनी भाषणात मिश्‍किलपणे केला. ते म्हणाले, ""एकच बुके अनेकवेळा हातात आला. शेवटी एकतरी फूल त्यात राहतेय का, हा प्रश्‍न पडला. राहुल शिंदेंनी स्वत:ची शाल सत्काराला दिली. एकच शाल सारखी हातात येत होती. त्यामुळे त्या शालीची माझी ओळख झाली. यावर एकच हश्‍या पिकला. बारामती मतदारसंघातील असेच उदाहरण देताना अजित पवार म्हणाले, ""माझ्या मतदारसंघात गाई वाटपाच्या कार्यक्रमाला मी जात होतो. प्रत्येक वेळी तीच तीच गाय दिसत होती. शेवटी ती गाय इतकी ओळखीची झाली, की ती मला चाटायला लागली.‘‘

Web Title: My father became chief minister attributed to our '