शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराबाबत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची 'ही' भूमिका 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 December 2019

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या नावात कोणताही बदल होऊ नये, अशी भूमिका ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी घेतली आहे. तशी विनंती खासदार संभाजीराजे यांना करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

डॉ. पाटील यांच्या भूमिकेनंतर संभाजीराजे यांनी पत्रकाद्वारे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो इतिहासकारांनी, तसेच शिवभक्तांनी घ्यावा, असे स्पष्ट केले. 

नामविस्ताराबाबत उलटसुलट प्रतिक्रिया

संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी होऊ नये, यासाठी शिवाजी विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार व्हावा, अशी भूमिका घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नामविस्ताराची प्रक्रिया सुरू करावी, अशी विनंती राज्यपालांना केली. नामविस्तार व्हावा की नाही, याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. शिवाजी महाराजांचे नाव संक्षिप्त होईल.

संभाजीराजेंनी फेरविचार करावा

सीएसटी सारखी शिवाजी विद्यापीठाच्या नावाची अवस्था होऊ नये, यासाठी संभाजीराजेंनी फेरविचार करावा, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या. डॉ. एन. डी. पाटील यांनी मूळ नावात बदल होऊ नये, अशी भूमिका घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमींचे शिष्टमंडळ उद्या (ता. 10) सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे.

डाव्या आघाडीचा नामविस्तारास विरोध

दरम्यान, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनीही नामविस्ताराबाबत भूमिका मांडली. डाव्या आघाडीने नामविस्तारास विरोध केला आहे. या पार्श्‍वभूमीवर संभाजीराजे यांनी भूमिका मवाळ केली. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी विचारपूर्वक शिवाजी विद्यापीठ असे नाव दिले होते. त्यावेळीही छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नाव दिल्यास भविष्यात त्यांचे संक्षिप्त रूप होईल, असा निष्कर्ष नोंदविला होता. शहरात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर वाद निर्माण होऊ नये, यासाठी ज्येष्ठांनीच मध्यस्थीचा निर्णय घेतला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: N D Patil Oppose To Change Shivaji University Name