शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या उपमहापौराच्या घरावर हल्ला

सूर्यकांत नेटके 
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवजयंती बाबत अहमदनगर येथील भाजपचे उपमहापौर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ध्वनिफीत व्हायरल झाली. त्यामुळे  नगरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी छिंदम यांच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कार्यकर्त्यांनी छिंदम यांच्या दिल्ली गेट येथील कार्यालयावर तसेच निवासस्थानावर दगडफेक केली आहे.

नगर : छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवजयंती बाबत अहमदनगर येथील भाजपचे उपमहापौर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ध्वनिफीत व्हायरल झाली. त्यामुळे  नगरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी छिंदम यांच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कार्यकर्त्यांनी छिंदम यांच्या दिल्ली गेट येथील कार्यालयावर तसेच निवासस्थानावर दगडफेक केली आहे.

शिवजयंती अवघ्या तीन दिवसांवर आली असताना भाजपच्या उपमहापौरांनी शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. मनपा कर्मचार्‍याची खरडपट्टी काढताना उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी कर्मचार्‍याला उद्देशून शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याची ऑडियो क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दरम्यान, कर्मचार्‍याने युनियनकडेही याबाबत तक्रार केली आहे.

उपमहापौरांच्या प्रभागातील एका कामासाठी त्यांनी कर्मचार्‍यांची मागणी केली होती. कर्मचारी न पाठविल्यामुळे त्यांनी आज (ता.१६) सकाळी बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे याला फोन करुन चांगलेच धारेवर धरले. आधीच कर्मचारी कमी असल्याने व शिवजयंती असल्याने कर्मचारी उपलब्ध होत नसल्याचे कारण कर्मचार्‍याने दिल्यानंतर उपमहापौरांनी कर्मचार्‍याला उद्देशून शिवाजी महाराजांबद्दल तसेच शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. या संवादाची ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून कर्मचारी युनियननेही याची गंभीर दखल घेतली आहे. 
छिंदम हे खासदार दिलीप गांधी यांचे समर्थक आहेत. त्यामुळे गांधी यांनी तातडीने दुपारी पत्रकार परिषद बोलावली. छिंदम यांचा शहरात ठिकठिकाणी फलक लावून कार्यकत्यानी निषेध केला आहे.
 

Web Title: nagar bjp leader use bad words shivaji maharaj