नगरमधील स्फोटातील कटात क्रूड बॉम्बचा वापर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

नगर : नगरमधील माळीवाडा येथील मारुती कुरिअर कार्यालयात झालेला स्फोट हा क्रूड बॉम्ब (हाताने बनविलेला बॉम्ब) असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी आज पत्रकारांना सांगितले. अज्ञात व्यक्तिने कार्यालयात ठेवलेले हे पार्सल पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते संजय नहार यांच्या नावाने पाठविण्या आल्याची चर्चा आहे. तथापि, त्याबाबत चोबे यांनी माहिती दिली नाही. 

या स्फोटात संदीप बापूराव भुजबळ व संजय क्षीरसागर हे दोघे जखमी झालेले आहेत. त्या घटनास्थळी आज विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, नाशिक येथील फॉरेन्सिक लॅबचे पथक, एटीएस, सायबर सेल, एलसीबी पथकाने भेट देऊन तपासणी केली. 

Web Title: nagar bomb spot used crewed bomb