Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीला दणका; माजी महापौरांचा शिवसेनेत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

नगरमध्ये राष्ट्रावादीला झटका बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला आहे.

नगर : नगरमध्ये राष्ट्रावादीला झटका बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला आहे.

अभिषेक कळमकर हे राष्ट्रवादीचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे पुतणे आहेत. अभिषेक कळमकर यांनी नगर मतदार संघात राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितली होती, परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी आज (ता.09) शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नगर जिल्ह्यात येऊन शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ केला. पारनेर येथे जाहीर सभा घेऊन शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार विजय औटी यांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या सभेत शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत विजय शिवसेनेचाच होणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता आल्यावर शेतकऱ्यांनवेचा सातबारा कोरा करू असे आश्वासन देखील उद्धव ठाकरे यांनी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagar EX Mayer Abhishek Kalamkar Enters In Shivsena