भाजपचा सत्तेचा मार्ग शिवसेनेच्या हाती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

नगर महानगर पालिकेच्या निकालाची संपूर्ण राज्याला उत्सुकता लागलेली आहे. एकूण १७ प्रभागांतील ६८ जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणी दरम्यान आघाडीवर असलेल्या उमेदवारांच्या नातेवाईकांकडून जल्लोष सुरू आहे.

नगर : राज्याचे लक्ष लागलेल्या नगर महापालिका निवडणुकीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून, भाजपला सत्तेत बसायचे असेल तर शिवसेनेची मदत घेतल्याशिवाय पर्याय नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनेही 25 जागा मिळवत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

नगर महानगर पालिकेच्या निकालाची संपूर्ण राज्याला उत्सुकता लागलेली आहे. एकूण १७ प्रभागांतील ६८ जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणी दरम्यान आघाडीवर असलेल्या उमेदवारांच्या नातेवाईकांकडून जल्लोष सुरू आहे. दुपारी एक वाजेपर्य़ंत आघाडी २५ (राष्ट्रवादी २१, काँग्रेस ४), भाजप १८, शिवसेना १७ जागांवर पुढे होते. महापालिकेत त्रिशंकू होण्याची शक्यता आहे.

सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या मतमोजणीदरम्यान कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर याबाबतच्या घोषणांकडे उपस्थितांचे लक्ष लागले होते. परिसरात खच्चून गर्दी झाली आहे.

Web Title: Nagar Municipal corporation election not any party majority