पारनेर पंचायत समितीत 1 कोटी वर्गः राहुल झावरे

सनी सोनावळे
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

टाकळी ढोकेश्वर (नगर): शालेय पोषण आहार योजनेसह तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणी बिले याकरिता जिल्हा परिषद मधून पारनेर पंचायत समितीत 1 कोटी  3 लाख रूपये वर्ग झाले आहेत, अशी माहिती पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांनी दिली.

झावरे म्हणाले, 'शालेय पोषण आहार योजनेसाठी 44 लाख रूपये मंजूर झाले असून, गेली वर्षभर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची फरकबिले व नुकत्याच मंजूर झालेल्या 53 प्राथमिक शिक्षकांची वरिष्ठ वेतनश्रेणी बिले यासाठी पंचायत समितीकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे मंजुरी मिळाली असतानाही ही बीले प्रलंबित होती. या निधीकरीता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. निधी मंजूर झाल्यामुळे दिवाळीपुर्वी या सर्व रकमा अदा केल्या जाणार आहेत. यामध्ये सर्व प्रकारची फरक बिले मंजूर केली जाणार असून, लोकभिमुख कारभार करताना कोणत्याही प्राथमिक शिक्षकाने आपल्या फरकबिलासाठी पंचायत समितीला येण्याची आवश्यकता नाही. या रकमा लवकरच वर्ग केल्या जातील असे झावरे यांनी सांगितले.

याप्रश्नी तालुका प्राथमिक शिक्षक संघ व गुरूमाऊली मंडळाने वेळोवेळी तालुक्याचे सभापती व शिक्षण समिती सदस्य राहुल झावरे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते.

Web Title: nagar news 1 crore in Parner Panchayat Samiti: Rahul zhaware