नगर: जवळ्यात जिल्हा सहकारी बँक फोडण्याचा प्रयत्न

अनिल चौधरी
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करण्या आगोदरच या चोरट्यांच्या हलचाली व चेहरे कॅमेरॅत बंद झाल्या आहेत दरम्यान सकाळी पारनेर पोलिस स्टेशनचेे पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी घटना स्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करत तपासाच्या दिशेने सुञे फिरवीली .त्यानंतर या चोरट्यांनी गावातील नामदेव बर्शिले  यांचे घर गाठले त्यांच्या कडे काहीही न मिळाल्याने त्यांना मारहाण करून माळवाडी येथे संजय रासकर याच्या घरात चोरीचा प्रयत्न केला परंतु तेथेही ते जागे झाल्याने चोरट्यांना काढता पाय घ्यावा लागला.

निघोज : जवळा( ता पारनेर )येथे येथील जिल्हा सहकारी बँकेची शाखा (बुधवारी) रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला परंतु रखवालदाराच्या सतक॑तेमुळे त्यांना रिकाम्या हाती पळ काढावा लागला .दरम्यान जवळा व परिसरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने येथील जनतेमध्ये भिंतीचे वातावरण तयार झाले असुन पारनेर पोलिसांपुढे चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

जवळा गावातील मध्यवती॑ मुख्य चौकात ग्रामपंचायत काया॑लयाच्या इमारतीच्या खालच्या मजल्यात जिल्हा सहकारी बँकेची शाखा असुन काल मंगळवारी  दोनच्या सुमारास पँट शट॑ घातलेल्या व तोंड बांधून  हत्यारबंद  आलेल्या अज्ञात  चोरट्यांनी प्रथम बँके बाहेर लावलेला सी सी टीव्ही कॅमेरा गजाने फोडत नादुरूस्त करून नंतर बँकेच्या मुख्य लोखंडी दरवाजा हत्याराच्या सहाय्याने तोडण्याचा प्रयत्न करत असताना शेजारीच मारूती मंदिरात बसलेले बँकेचे रखवालदार अमोल वसंतराव खुपटे  यांना आवाज झाल्याने बँकेचा दरवाजा कुणीतरी तोडत असल्याचे दिसले प्रथमतः ते घाबरुन गेले परंतु प्रसंगावधान राखत त्यांनी जवळच राहत असलेले बँकेचे शाखाधिकारी बबन शेलार यांना भ्रमणध्वनी करूून कल्पना दिली त्यांनी ताबडतोब शेजार्यांना अशोक शेलार व इतरांना  मदतीला घेऊन बँकेकडे आले परंतु चाहुल लागताच चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले त्यामुळे बँकेत सुमारे वीस लाख रूपयांची च्या पुढील रोख रक्कम वाचली.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करण्या आगोदरच या चोरट्यांच्या हलचाली व चेहरे कॅमेरॅत बंद झाल्या आहेत दरम्यान सकाळी पारनेर पोलिस स्टेशनचेे पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी घटना स्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करत तपासाच्या दिशेने सुञे फिरवीली .त्यानंतर या चोरट्यांनी गावातील नामदेव बर्शिले  यांचे घर गाठले त्यांच्या कडे काहीही न मिळाल्याने त्यांना मारहाण करून माळवाडी येथे संजय रासकर याच्या घरात चोरीचा प्रयत्न केला परंतु तेथेही ते जागे झाल्याने चोरट्यांना काढता पाय घ्यावा लागला. एकाच रात्री जवळा गावात धुमाकूळ घातल्याने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

जवळा परिसरात चोर्यांचे प्रमाण वाढत असुन गावात वाड्या वस्त्यांवर  नागरिक भीतीच्या सावटा खाली वावरत आहेत तरी पोलिस प्रशासनाने संबंधित चोरट्यांना जेरबंद करून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच किसनराव रासकर यांनी केली आहे.

Web Title: Nagar news decoit in bank