फळ व्यापाऱ्याच्या खुनातील आरोपींना कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

कर्जत (नगर) - मुंबई येथील फळ व्यापाऱ्याचा खून करून त्याचा मृतदेह खेड शिवारातील भीमा नदीपात्रात टाकून देण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना पोलिसांनी पहाटे अडीच वाजता अरणगाव शिवारातून अटक केली. अक्षय राऊत (वय 21) आणि चंद्रकांत राऊत (वय 23, दोघेही रा. पारेवाडी, ता. जामखेड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. न्यायालयात हजर केले असता, त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायाधीश धनाजी पाटील यांनी दिला. या गुन्ह्यातील आणखी एक संशयित पसार आहे. त्यालाही लवकरच अटक केली जाईल, असे पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले. 

Web Title: nagar news fruit trader murder case