नगर - कोपर्डी अत्याचार व खून खटल्यात तिन्ही आरोपींच्या शिक्षेवर उद्यापासून (मंगळवार) विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तिवाद होणार आहे. हा युक्तिवाद दोन दिवस चालेल.
कोपर्डी खटल्याचे कामकाज पूर्णपणे संपलेले आहे. या खटल्यातील आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (वय 25, रा. कोपर्डी, ता. कर्जत), संतोष गोरख भवाळ (वय 30, मूळ रा. खांडवी, हल्ली कोपर्डी) व नितीन गोपीनाथ भैलुमे (वय 26, रा. कोपर्डी) यांना न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी 18 तारखेला दोषी ठरविले होते. आता उद्यापासून आरोपींच्या शिक्षेवर युक्तिवाद होणार आहे. उद्या आरोपी नितीन भैलुमे याचे वकील ऍड. प्रकाश आहेर युक्तिवाद करतील. त्यानंतर बुधवारी (ता. 22) मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे व संतोष भवाळ यांचे वकील ऍड. योहान मकासरे युक्तिवाद करतील. त्यानंतर सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद होईल.
|