कोपर्डी बलात्कार : पिडीत मुलगी घटनेनंतर जीवंत असण्याची शक्‍यता

सूर्यकांत नेटके
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

पिडीतेची मैत्रिण ही मैत्रिणच नाही. तिचे घर पाचशे मिटरवर असताना आणि तेथे पाचशे लोक घटनास्थळा जमलेले असताना मैत्रिणीला घटना थेट रात्री अकरा वाजता कशी कळते? मैत्रिणच खोटी आहे. छेडछाडीचा आणि धमकी दिल्याचा प्रकार घडलाच नाही, मात्र छेडछाड दाखवण्यासाठी मैत्रिण तयार केली

नगर - कोपर्डी येथे पिडीत मुलीवर अत्याचार झाल्यानंतर कोणत्याही
साक्षीदाराने ती मयत झाल्याचे सांगितले नाही. त्यामुळे ती घटनेनंतर जिवंत असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, असे आरोपी संतोष भवाळच्या वकीलांनी अंतीम युक्तीवादात सांगितले. "पिडीतेची मैत्रिण ही काल्पनीक आहे. ती खरी मैत्रिण नाही,''असे म्हणणे ऍड. बाळासाहेब खोपडे व ऍड. विजयालक्ष्मी खोपडे यांनी न्यायालयात मांडले. भवाळचा घटनेशी काही सबंध नसल्याचे पुरावे आम्ही दिल्याचे ते म्हणाले. फिर्यांदीचा त्यांनी "सुपरमॅन" तर मैत्रिणीचा "गोष्ट साक्षीदाराची' असा उल्लेख केला.

कोपर्डी येथील बलात्कार व खुन खटल्याचा विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर अंतिम युक्तिवाद सुरू आहे. आज आरोपी क्रमांक
दोन संतोष भवाळचे वकील ऍड. बाळासाहेब खोपडे व ऍड. विजयालक्ष्मी खोपडे यांनी अंतीम युक्तीवादात म्हणणे मांडले. घटनास्थळाचा नकाशा तयार केला आहे. मात्र त्यात अनेक त्रुटी आहेत. दोषारोपपत्रासोबत नकाशा दाखल करतानाही दोष होता. नकाशा संगणकीय असल्याने 65 बी च्या कायद्यानुसार त्यासोबत पडताळणी प्रमाणपत्र देणे गरजेचे होते, ते दिले नाही. असाच प्रकार घटनास्थळाच्या छायाचित्राबाबतही आहे. छायाचित्रही संकणकीय प्रिंट काढलेले आहेत. त्यामुळे त्याच्या सत्यतेची पडताळणी करणारे प्रमाणपत्र दिलेले नाही.

'साक्षीदार ज्या कठड्यावर बसले त्याची उंची, लांबी नाहीत. त्याचा पंचनामाही नाही. फिर्यांदी अवघ्या अर्ध्यां तासात घटनास्थळी जातो, आरोपीचा पाठलाग करतो, साडेचारशे मीटर पळत येऊन त्याच्या आईशी गप्पा मारतो हे विशेष असल्याचे सांगत फिर्यादीचा "सुपरमॅन' असा उल्लेख केला. पिडीतेची मैत्रिण ही मैत्रिणच नाही. तिचे घर पाचशे मिटरवर असताना आणि तेथे पाचशे लोक घटनास्थळा जमलेले असताना मैत्रिणीला घटना थेट रात्री अकरा वाजता कशी कळते? मैत्रिणच खोटी आहे. छेडछाडीचा आणि धमकी दिल्याचा प्रकार घडलाच नाही, मात्र छेडछाड दाखवण्यासाठी मैत्रिण तयार केली. पिडीतेच्या बहीणीला सायकल ओळखता आली नाही. शिवाय मैत्रिणेने आरोपी संतोष भवाळला ओळखले नाही. भवाळ त्या गावचा राहाणारा नाही. त्याचा या घटनेशी काही सबंध नाही. पिडीत मुलगी घटनेनंतर बऱ्याच काळ जीवंत असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही,' असे दावा ऍड. खोपडे यांनी केला.

"घडलेली घटना दुर्दैवी आहे. निरापराधाला शिक्षा होऊ नये यासाठी वकील म्हणून खऱ्या आरोपीपर्यत पोचण्यासाठी प्रयत्न करणे आमचे काम आहे. त्यामुळे आम्ही सहकार्य करत असल्याचे,' त्यांनी स्पष्ट केले.

चिखलात चकरा कशा मारल्या
घटना घडण्याआधी आरोपींनी दुचाकीवर चकरा मारल्याचे सांगितले जात आहे.
मात्र घटनेनंतर जप्त केलेल्या दुचाकीला चिखल लागला होता, पोलिस ठाण्यात
आवारात दुचाकी असताना पाऊस येऊन दुचाकीचा चिखल निघून गेला असे
सांगितले जात आहे. असे असेल तर चिखलात आरोपींनी चारीने दुचाकीवर चकरा कशा
मारल्या असा प्रश्‍न ऍड. योहान मकासरे यांनी व्यक्त केला. सकाळच्या
सत्रात त्यांचा अंतीम युक्तीवाद संपला

Web Title: nagar news: kopardi rape crime police