खोदू शोषखड्डे, दुष्काळाचे सुटेल कोडे!

मार्तंडराव बुचुडे
सोमवार, 15 जानेवारी 2018

पारनेर (नगर): दररोज वाया जाणारे लाखो लिटर सांडपाणी शोष खड्डे घेऊन त्यात साठविले तर जमिनीतील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होते, दुष्काळावरही मात करता येते इतकेच नाही तर रोगराईपासूनही गावातील लोकांची मुक्तता करता येते हे इंगीत ओळखून म्हसणे-सुलतानपूर या गावातील ग्रामस्थांनी वाया जाणारे पाणी शोष खड्डे घेऊन साठविण्याचा निर्धार केला आहे. यात महिला व तरूणांबरोबरच वृद्धही मोठ्या प्रमाणात ऊत्साहाने सहभागी झाले आहेत

पारनेर (नगर): दररोज वाया जाणारे लाखो लिटर सांडपाणी शोष खड्डे घेऊन त्यात साठविले तर जमिनीतील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होते, दुष्काळावरही मात करता येते इतकेच नाही तर रोगराईपासूनही गावातील लोकांची मुक्तता करता येते हे इंगीत ओळखून म्हसणे-सुलतानपूर या गावातील ग्रामस्थांनी वाया जाणारे पाणी शोष खड्डे घेऊन साठविण्याचा निर्धार केला आहे. यात महिला व तरूणांबरोबरच वृद्धही मोठ्या प्रमाणात ऊत्साहाने सहभागी झाले आहेत

म्हसणे व सुलतानपूर ही पारनेर तालुक्यातील दोन वेगवेगळी महसुली गावे आहेत. मात्र, या दोन गावांची ग्रामपंचायत एकच आहे. सुमारे एक हजार आठशेच्या आसपास या दोन गावांची मिळून लोकसंख्या आहे. जिल्ह्यातीलच नव्हे तर पारनेर तालुक्यातील अनेकांना सुलतानपूर हे गाव पारनेर तालुक्यात आहे याचीच माहीती नाही. या दोन गावांच्या मध्ये फक्त ओढा आहे त्यामुळे त्यांची हद्दही लक्षात येत नाही. या दोनही गावातील अनेक तरूण, महिला व कार्यकर्त्यांनी पाणी फाऊडेशनच्या मार्गदर्शनाखाली गावातील वाया जाणारे पाणी अडविण्याचा निर्धार केला आहे. प्रत्येक घराशेजारी शोष खड्डे घेण्याचे काम सुरू आहेत. या साठी महिलांसह तरूणही मोठ्याप्रमाणात सभागी झाले आहे. राजकारण बाजूला ठेऊन दुष्काळावर मात करण्यासाठी व जमिनीतील पाणी पातळी वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्र येत हा ऊपक्रम हाती घेतला आहे. यातून गाव दुष्काळमुक्त व पाणीदार करण्याचा संकल्प केला आहे.

या कामासाठी पाणी फाऊंडेशनचे बाळासाहेब शिंदे, शरद घनवट व मयुरी जमदाडे तसेच सरपंच रामदास तरटे, ग्रामपंचायत सदस्य, गावातील महिला, पुरुष, तरुण व बाहेरगावी असणारी मंडळी मदत करत आहेत. पाणी हे जीवन आहे व त्याशिवाय प्रगती नाही, शेती नाही, गावाचा विकास नाही, स्थानिकांना रोजगार नाही हे ओळखून काम सुरू केले आहे. शोष खड्यांमुळे कचरा टाकीत तळाला राहुन वाया जाणारे पाणी जमिनीत मुरवता येते व जमिनीत पाण्याची पातळी टिकुन राहण्यास मदत होते.

रोजचे माणसी सर्वसाधारण २० लिटर पाणी वापरुन वाया जाते याचा विचार करता गावातील सुमारे दीड कोटी लिटर पाणी दररोज वाया जाते. तेच वाया जाणारे पाणी शोषखड्ड्यांमार्फत जमीनित जिरवले तरी किमान वर्षाला जमिनीत दीड कोटी लिटर पाण्याची भर पडणार आहे.

सहा हजार झाडांचे संवर्धन
गावातील कालभैरवनाथ मित्रमंडळाने यापुर्वीच गावात वृक्षारोपण करुन अतिशय सुंदर अशी झाडे वाढवली आहेत. त्यांनी दर चार दिवसाला एका टँकरद्वारे पाणी घालून सुमारे सहा हजार झाडे जगवली आहेत. यासाठी सामाजिक वनिकरण विभागाचीही मदत मिळाली आहे. या कामात गावातील विलास तरटे, शहाजी काळे, नितीन बागल, सुनिता तरटे, योगेश ब-हाटे, सुभम पठारे, शरद बालवे, ओंमकार मगर, योगेश गुंड, ज्ञानेश गुंड, राजेश तरटे, शिवदास गुंड, अक्षय बागल, सागर गुंड, कावेरी मगर, मोनिका बागल आदी तरूण व महिला आघाडीवर आहेत.

Web Title: nagar news mhasne sultanpur water and tree