मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील पहीला रस्ता पारनेर तालुक्यात

सनी सोनावळे
बुधवार, 10 जानेवारी 2018

टाकळी ढोकेश्वर (नगर): दळणवळण सुलभ होण्यासाठी तालुक्यातील वाड्या वस्ती मुख्य प्रवाहात जोडण्याचा मानस आहे. कच्या रस्त्यांचे डांबरीकरण व्हावे, अशी ग्रामस्थांची मागणी असते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील पहीला रस्ता पारनेर तालुक्यात झाला असून, सरकारी योजनेचा योग्य व नियोजनबद्ध वापर केल्यास काय होवू शकते याचे उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे, असे प्रतिपादन आमदार विजय औटी यांनी केले.

पारनेर तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील काताळवेढा ते डोंगरवाडी या रस्त्याचे लोकार्पण आमदार औटी यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते होते.

औटी म्हणाले, 'या रस्त्याकरीता भरीव असा १ कोटी ९ लाख रुपये निधी मिळाला त्यामुळे काम दर्जेदार झाले आहे. तालुक्यातील रस्ते जोडुन आपण माणसे जोडण्याचे काम केले आहे.' दाते म्हणाले, औटी यांच्या दुरदृष्टीमुळे तालुक्यातील दुर्गम भागात विकासाची संजीवनीच मिळाली आहे. लोकांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी दळणवळण महत्वाचे आहे. यावेळी बाजार समितीचे संचालक अशोक कटारिया, सरपंच मंदा गाजरे, उपसरपंच ठका कडूसकर, विभाग प्रमुख पोपट गुंड, ललिता डोंगरे, दिमाबाई डोंगरे उपस्थित होते.

Web Title: nagar news parner mukhyamantri gram sadak yojana