पाच हजाराची लाच घेताना पोलिस पकडला

सूर्यकांत नेटके
गुरुवार, 18 जानेवारी 2018

नगर - पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तात्पुरता अटकपुर्व जामीन घेतल्यावर त्या बाबत न्यायालयात म्हणणे मांडण्यासाठी पाच घेताना भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यातील पोलिसाला बुधवारी  (ता. 17) रात्री पाच हजार रूपयांची लाच घेताना पकडले. दिलीप रामकृष्ण तिकोणे असे लाच घेणारया पोलिसांचे नाव आहे. 

नगर च्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणारया तक्रार दाराकडे त्याच्यावर दाखल  असलेल्या गुन्ह्यासबंधी न्यायालयात म्हणणे मांडण्यासाठी तिकोने यांनी दहा हजाराची लाच मागितली होती. त्यातील पाच हजार रूपये घेताना नगरमध्ये जी. पी. ओ. चौकात लाचलुचपत च्या पथकाने रंगेहाथ पकडले.  

नगरमध्ये मंगळवारी  लाचलुचपत विभागाच्या पथकाने जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील एका विस्तार अधिकारयाला लाच घेताना पकडल्यावर दुसरया दिवशी पोलिसाला पकडले. 

लाचलूचपत विभागाच्या सलग दुसरया दिवशीच्या या कारवाईने जिल्हा परिषदेसोबत पोलिस विभागावरही नामुष्कीची वेळ आली आहे.

Web Title: nagar news police arrested bribe