मोदींविरोधातील पोस्टमुळे पोलिस निलंबित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

पंतप्रधान मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याबाबत तक्रारी आल्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने उपअधीक्षकांनी चौकशी करून अहवाल दिला.

नगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या आरोपावरून कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांचा अंगरक्षक असलेल्या पोलिसाला निलंबित केल्याची चर्चा रविवारी होती. मात्र, पोलिस दलातील कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याला दुजोरा दिला नाही. 

पंतप्रधान मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याबाबत तक्रारी आल्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने उपअधीक्षकांनी चौकशी करून अहवाल दिला आणि आज संबंधित पोलिसाला निलंबित केले, अशी माहिती देणारे संदेश दिवसभर सोशल मीडियावर फिरत होते.

याबाबत माहिती घेण्यासाठी पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याशी संपर्काचा प्रयत्न केला; मात्र संपर्क झाला नाही. अन्य वरिष्ठ अधिकारी याबाबत कोणतीही माहिती देत नव्हते. 

Web Title: Nagar news police suspends on write against Narendra Modi