नगरमध्ये लोकप्रतिनिधींच्या कार्यालयाला ठोकले टाळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

नगर - शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी बुधवारी जिल्हाभरात आंदोलन झाले. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी तलाठी कार्यालयांना टाळे ठोकले. काही गावांचे आठवडे बाजार बंद होते. सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यासह लोकप्रतिनिधींच्या घर-कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

पारनेरला तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. काही ठिकाणी दूध-भाजीपाल्याची वाहने अडविण्यात आली. पोलिस संरक्षण देण्याची मागणी दूध संकलन केंद्रांच्या चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

मुद्दे
- तलाठी, मंडलाधिकारी कार्यालयांना टाळे
- नगरच्या खासदारांच्या घरासमोर चटणीभाकरी खाऊन आंदोलन
- आठवडे बाजार बंद
- आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सक्रिय सहभाग
- बाजार समित्या सुरू; आवक मात्र कमी

Web Title: nagar news public leader office lock by farmer