नेवासे तालुक्यात १३ गावात रंगणार निवडणुकांचा फड

sarpanch election
sarpanch election

नेवासे : नगराध्यक्षांपाठोपाठ आता सरपंचांच्याही निवडीही थेट जनतेतून होणार आहेत. या धर्तीवर आगामी काळात नेवासे तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या फडामध्ये सरपंचपदासाठी तालुक्यात 'क्रांतिकारी', राष्ट्रवादी व भाजपा यांच्यात लढती होण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थावर वर्चस्व निर्माण करण्याचे 'क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे लक्ष असलेतरी त्यांना राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजपाशी झुंज द्यावी लागणार आहे. निवडणूक होणार असणार्याे बहुतांशी ग्रामपंचायतींवर माजी आमदार शंकारराव गडाखांचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनाही तालुक्याकडे लक्ष केंद्रात केले. घुले बंधूंवर पाठीत 'खंजीर' खुपसल्याचा आरोप करत 'राष्ट्रवादी'ची गडाखांनी फारकतीचा सर्वात मोठा फटका घुलेंच्या मदतीवर अवलंबून असणारे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या 'भाजपा'वर झाला. घुले निष्ठ मुरकुटे समर्थकांच्या 'राष्ट्रवादी' झालेली घरवापसी व मुरकुटेंचे अनेक विश्वासू समर्थक 'क्रांतिकारी' प्रेमी झाल्याने तसेच भाजपांतर्गत वाद, शिवसेना, शेतकरी संघटनांनी सोडलेल्या साथीने तालुक्यात 'मुरकुटें'ची भाजपा कमकुवत झाली. मात्र मुरकुटेंनीही घुलेंच्या सहकार्‍याची अपेक्षा न ठेवता निवडणुकीची तयारी करत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात आगामी निवडणूकात तिरंगी लढत जरी होणार असली तरी खरी लढत 'क्रांतिकारी' विरुद्ध 'राष्ट्रवादी' यांच्यातच होणार हे मात्र निश्चित.

आज तरी तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर 'क्रांतिकारी'चेच वर्चस्व आहे. राष्ट्रवादीची सध्या तालुक्यात 'शाखा' उद्घाटनाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची जुळवाजुळव चालू आहे. मात्र थेट जनतेतून सरपंचाची निवड होणार असल्याने कोण किती यश मिळवते ? हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. पक्षापेक्षा उमेदवार, त्याचे काम, नागरिकांशी असलेल्या संपर्क, त्याची पार्श्वभूमी आदि कामे मतदार पाहातात. त्यामुळे चांगला उमेदवार आपल्याकडे खेचण्यासाठी आतापासूनच सर्वपक्षीयांनी जोर लावला आहे. प्रथमच सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार असल्याने उमेदवारांसह मतदारांमधील उत्सुकताही कायम आहे. 

यंदा सरपंच निवड थेट जनतेतून होणार आहे. ता.१५ ते २२ सप्टेंबरदरम्यान अर्ज सादर करता येतील. अर्जांची छाननी ता. २५ सप्टेंबरला होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत ता. २७ सप्टेंबरपर्यंत आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करून उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. सात ऑक्टोबरला मतदान व नऊ ऑक्टोलबरला मतमोजणी होईल.

निवडणूक जाहीर झालेले गावे व सरपंचपदाचे आरक्षण
माका, गोधेगाव, हिंगोणी , हंडीनिमगाव, (नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती), शिरेगाव (अनुसूचीत जमाती स्रि), चिंचबन, कांगोणी, सुरेशनगर (सर्वसाधारण व्यक्ती), वडाळा बहिरोबा, माळीचिंचोरे (नागरिकांचा मागासप्रवर्ग स्रि), अंमळनेर, खुपटी (सर्वसाधारण स्रि) भेंडे खुर्द (अनुसूचीत जाती व्यक्ती) असे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com