शौचालय बांधा घरोघरी त्यासाठी सभापती लोकांच्या दारी

संजय आ. काटे
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

श्रीगोंद्यात पंचायत समितीची मोहीम

श्रीगोंदे (जिल्हा नगर) : हागणदारी मुक्ती गाव विकासासाठी आवश्यक आहे. प्रत्येक कुटूंबाने शौचालय बांधलेच पाहिजे ही आग्रही विनवणी दारोदारी जाऊन करण्याची मोहिम पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम लगड यांनी हाती घेतली आहे. 

'शौचालय बांधा घरोघरी सभापती आपल्या दारी' या पंचायत समितीच्या मोहिमे अंतर्गत आढळगाव येथे सभापती लगड गटविकास, अधिकारी अलका शिरसाट व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी घरोघरी जात शौचालयाबाबत जागृती केली. यावेळी लगड म्हणाले ,शौचालयासाठी पंचायत समिती अनुदान देण्यात देते. या योजनेत जनतेने सहभागी व्हावे यासाठी हा उपक्रम होती घेतला. तालुक्यातही मोहीम राबविली जात असून अनेक गावातील लोकांनी प्रतिसाद दिला आहे.

आढळगाव हागणदारी मुक्त करण्यासाठी लोकांचा सहभाग आवश्यक असून तेथील ग्रामविकास अधिकारी शिवाजी वाहुरवाघ हे हागणदारी मुक्तीवर अतिशय चांगल्या प्रकारे प्रबोधन करतात. त्यांच्या या कार्याची जिल्हा परिषदेने दखल घेतली असून गावकऱ्यांनी त्यांना साथ करणे आवश्यक आहे. 
गटविकास अधिकारी अलका शिरसाट, कृषी अधिकारी जयंत साळवे, विस्तार अधिकारी वाकचौरे, स्वछता कक्षाचे राहुल साळवे, कुर्हे ,ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संदीप लगड, सरपंच मीरा वाकडे ,उपसरपंच जिजाराम डोके, बापूराव जाधव, शरद जमदाडे, भाऊसाहेब बोत्रे, बळीराम बोडखे, शिवप्रसाद उबाळे उपस्थित होते. 

घरोघरी जाऊन हात जोडणार- लगड 
शौचालय आरोग्यासह गावाच्या विकासासाठी आता आवश्यक बनल्याने गरज असेल तेथे घरोघरी जाऊन लोकांना शौचालय बांधण्यासाठी हात जोडून विनंती करून गुलाब पुष्प देऊन विनंती करण्याचे धोरण सध्या राबविले असल्याचे सभापती लगड म्हणाले.

Web Title: nagar news shrigonda toilet building campaign