नगर जिल्ह्याला पावसाचा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

नगर - नगर जिल्ह्यास गुरुवारी वादळी पावसाचा तडाखा बसला. त्यात वीज पडून पारनेर तालुक्‍यातील टाकळी ढोकेश्‍वर येथे युवकाचा, तर श्रीरामपूर येथे एका गायीचा मृत्यू झाला. कोपरगाव तालुक्‍यातील पुणतांबे येथे गारांचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली. श्रीगोंदे व नगर तालुक्‍यात वादळाने घरांवरील पत्रे उडाले. काही ठिकाणी घरांची किरकोळ स्वरूपात पडझड झाली.

जोराचा वारा असल्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्याही तुटल्या. त्यात तुटलेल्या झाडांच्या फांद्या नगर-दौंड मार्गावर पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. शहरातील चौपाटी कारंजा येथील मोठा फ्लेक्‍स विजांच्या तारांवर कोसळला. त्यातून काही भागाचा वीज प्रवाह खंडित झाला. नगर शहराच्या उपनगरांमधील केडगावमध्ये दूधसागर सोसायटीतील एका घराचे पत्रे उडाले, तर एका घराची भिंत कोसळली. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या भागात नगर-पुणे महामार्गावर वादळाने काही ठिकाणी फ्लेक्‍सचे खांब कोसळले.

भिंगार रस्त्यावरील वडाचे एक झाड कोसळल्याने तेथील वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती. नगर तालुक्‍यातील बाबुर्डी बेंद, अरणगाव, सोनेवाडी, खडकी, खंडाळा, अकोळनेर, भोरवाडी, सारोळे कासार परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. शहरातील केडगाव, नागापूर, बोल्हेगाव, एमआयडीसी, निंबळक परिसरातही वादळ व पावसाने हजेरी लावली.

Web Title: nagar news storm rain